IND vs PAK: पाकिस्तानने पुन्हा एकदा दाखवला माज, भारतीय क्रिकेट संघाला दिला असा इशारा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे साखळी फेरीत या दोन्ही संघांचा सामना होणार हे निश्चित झालं होतं. 15 फेब्रुवारीला दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानने माज दाखवण्यास सुरुवात केली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद गेल्या काही वर्षात टोकाला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय भारतीय संघाने पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे दोन्ही देश फक्त मल्टीनॅशनल स्पर्धेतच आमनेसामने येतात. इतकंच काय तर तटस्थ ठिकाणी या दोन्ही संघांचा सामना होतो. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात सामना होणार हे स्पष्टच होतं. 7 फेब्रुवारीपासून टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर 15 फेब्रुवारीला भारत पाकिस्तान हे संघ श्रीलंकेत हे दोन्ही संघ भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या प्रेमादासा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला एका महिन्याचा अवधी शिल्लक असताना पाकिस्तानकडून वाकयुद्ध सुरू झालं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यापूर्वीच पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने बेताल वक्तव्य करत टीम इंडियाला इशारा देत आहे.
आशिया कप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर भारत पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आशिया कप स्पर्धेपासून भारतीय संघाने नो हँडशेक पॉलिसी स्वीकारली होती. आताही तसंच असेल यात काही शंका नाही. त्यामुळे या सामन्यापूर्वीही वादाला फोडणी मिळणार यात काही शंका नाही. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी म्हणाला की, “सीमेपलीकडून आलेल्यांनी खेळ भावनेचे उल्लंघन केले आहे. पण आमचे काम क्रिकेट खेळणे आहे आणि आमचे लक्ष त्यावर आहे. आम्ही त्यांना मैदानावर योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करू.” सध्या तरी भारताने या विषयावर मौन बाळगले आहे.
भारताने आशिया कप स्पर्धेत सलग तीन वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. महिला क्रिकेटपटूंनीही वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला लोळवलं. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा एकदा लोळवण्यासाठी सज्ज झाला आहे. आतापर्यंतचा टी20 स्पर्धेचा इतिहास पाहिला तर भारताचं पारडं जड आहे. भारत पाकिस्तान हे संघ 16वेळा आमनेसामने आले. यात पाकिस्तानला फक्त तीन वेळा विजय मिळाला आहे. तर भारताने 12 वेळा पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तर एक सामना बरोबरीत सुटला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 8 वेळा आमनेसामने आले आणि भारताने 7-1 असा विजय मिळला आहे.2022 पासून पाकिस्तानने भारताविरुद्ध एकही सामना जिंकलेला नाही. तर भारताने सलग पाच सामन्यात विजय मिळवला आहे.
