लोकलने जाणाऱ्या शार्दुल ठाकूरला भारदस्त गिफ्ट, आनंद महिंद्रांकडून Thar SUV पालघरच्या दारात उभी

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघातील 6 खेळाडूंना 6 महिंद्रा थार एसयूव्ही भेट देण्याचे जाहीर केले होते (Shardul Thakur Anand Mahindra Thar )

लोकलने जाणाऱ्या शार्दुल ठाकूरला भारदस्त गिफ्ट, आनंद महिंद्रांकडून  Thar SUV पालघरच्या दारात उभी
शार्दुल ठाकूरला आनंद महिंद्रांकडून थार गाडी भेट
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 12:48 PM

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नवा यॉर्करकिंग टी नटराजन (T Natrajan) पाठोपाठ ऑलराऊंडर गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही (Shardul Thakur) महिंद्राची SUV थार (Mahindra Thar) भेट दिली. शार्दुलने ट्विटरवरुन महिंद्रांचे आभार व्यक्त केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयात शार्दुलचा सिंहाचा वाटा होता. (Shardul Thakur thanks Anand Mahindra after receiving brand new Mahindra Thar SUV for Australia win)

“नवीन महिंद्रा थार आली आहे!! महिंद्राने अक्षरशः एका दणकट गाडीची निर्मिती केली आहे. मला ही एसयूव्ही चालवण्यास खूप आनंद झाला. आपल्या देशातील तरुण याकडे अभिमानाने पाहतील. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील आमच्या योगदानाचा गौरव केल्याबद्दल पुन्हा एकदा आनंद महिंद्रा आणि प्रकाश वाकणकर यांचे आभार” असे ट्विट शार्दुलने केले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारतीय संघातील 6 खेळाडूंना 6 महिंद्रा थार एसयूव्ही भेट देण्याचे जाहीर केले होते. त्यामध्ये मोहम्मद सिराज, टी नटराजन, शार्दुल ठाकुर, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल आणि नवदीप सैनी यांचा समावेश आहे. (Shardul Thakur Anand Mahindra Thar )

ऑस्ट्रेलियन भूमीत शानदार विजय

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर 4 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकून इतिहास रचला होता. अनेक बडे खेळाडू संघात नसतानाही मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला तीन विकेट्सने पराभूत करुन भारताने बॉर्डर-गावस्कर मालिकेवरील आपला ताबा कायम राखला. भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे आनंदित बीसीसीआयने यापूर्वीच भारतीय खेळाडूंना बोनस म्हणून 5 कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे.

नटराजनचं महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट

नटराजनच्या शानदार बोलिंग परफॉर्मन्सने खूश होऊन आनंद महिंद्रा यांनी नटराजनला महिंद्रा गाडी देण्याची घोषणा केली होती. महिंद्रा यांनी आश्वासन पाळलं. महिंद्रा यांनी पाठवलेली गाडी नटराजनला मिळाली. त्यानंतर नटराजननेही आनंद महिंद्रा यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. ब्रिस्बेन टेस्टमध्ये जी जर्सी नटराजनने परिधान केली होती. त्या जर्सीवर सही करुन ती जर्सी त्याने महिंद्रा यांना दिली आहे.

संबंधित बातम्या :

भारदस्त कार भेट देणाऱ्या आनंद महिंद्रांना टी नटराजनकडून खास रिटर्न गिफ्ट

आधी लोकल, आता कारने 10 तासात 700 किमी प्रवास, शार्दूल ठाकूरच्या जिद्दीला सलाम!

आधी मुंबई लोकलमधून पालघरला परतला, आता शार्दूल ठाकूर मुंबई विमानतळावरुन कुठे गेला?

(Shardul Thakur thanks Anand Mahindra after receiving brand new Mahindra Thar SUV for Australia win)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.