AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: पहिल्या वनडेआधी शिखर धवनने वापरले खूपच कठोर शब्द

IND vs NZ: आपल्याच टीमबद्दल बोलताना शिखर धवन हे शब्द बोलून गेला.

IND vs NZ: पहिल्या वनडेआधी शिखर धवनने वापरले खूपच कठोर शब्द
shikhar-dhawan Image Credit source: AFP
| Updated on: Nov 23, 2022 | 4:30 PM
Share

वेलिंग्टन: न्यूझीलंडवर टी 20 सीरीजमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासमोर आता वनडे सीरीजच आव्हान आहे. शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या या सीरीजमध्ये शिखर धवन कॅप्टन आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माल विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनवर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

वनडे सीरीज सुरु होण्याआधी शिखर धवनने एक मोठ वक्तव्य केलय. “टीमच्या हिताचे निर्णय घेताना मी अजिबात कचरत नाही. मग, भले कुठल्या खेळाडूला वाईट वाटलं तरी फिकिर करत नाही” असं धवन म्हणाला.

कॅप्टन म्हणून निर्णय क्षमतेत सुधारणा

कॅप्टन म्हणून निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा झाल्याच शिखर धवनने सांगितलं. “तुम्ही जितके जास्त खेळता, तितका तुमचा तुमच्या निर्णयावर विश्वास पक्का होत जातो. याआधी मी एखाद्या गोलंदाजाला सन्मान देऊन अतिरिक्त ओव्हर देत असे. पण आता मी परिपक्व झालोय. कोणाला वाईट वाटलं तरी चालेल, पण टीमच्या हिताचे निर्णय घेणार” असं शिखर म्हणाला.

धवनसमोर कठीण आव्हान

न्यूझीलंडला त्यांच्याच देशात वनडे सीरीजमध्ये हरवणं इतकं सोप नाहीय. मागच्या न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियाचा मजबूत संघ तिथे जिंकू शकला नव्हता. यावेळी टीम इंडियात सीनियर खेळाडू सुद्धा नाहीयत. अशा स्थितीत वनडे सीरीज जिंकण धवनसाठी एका चॅलेंज आहे. धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 3-2 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2-1 ने विजय मिळवलाय. वेस्ट इंडिज विरुद्ध सुद्धा टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप विजय मिळवला होता.

धवनवर व्यक्तीगत परफॉर्मन्सचा दबाव

मागच्यावेळी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये शिखर धवनची बॅट शांत होती. धवनने 3 मॅचमध्ये फक्त 25 धावा केल्या. पुढच्यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप आहे. धवनला टीममध्ये स्थान कायम टिकवायचं असेल, तर त्याला प्रदर्शनात सातत्य ठेवावं लागेल.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.