AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवम दुबेचं लकही चाललं नाही, 37 सामन्यानंतर टीम इंडियाने पाहीला पराभवाचा दिवस

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभूत केलं. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासमोर 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान कांगारूंनी 14 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात शिवम दुबेचं लकही चाललं नाही.

शिवम दुबेचं लकही चाललं नाही, 37 सामन्यानंतर टीम इंडियाने पाहीला पराभवाचा दिवस
शिवम दुबेचं लकही चाललं नाही, 37 सामन्यानंतर टीम इंडियाने पाहीला पराभवाचा दिवसImage Credit source: PTI
| Updated on: Oct 31, 2025 | 6:29 PM
Share

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 4 गडी राखून मात केली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने 17 वर्षानंतर मेलबर्नमध्ये सामना गमावला आहे. पण चर्चा मात्र शिवम दुबेची होत आहे. त्याला कारणही तसंच आहे. शिवम दुबे टीम इंडियासाठी कायम लकी ठरल्याचं बोललं जात आहे. शिवम दुबे हा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा लक फॅक्टर होता. कारण भारताला 37 टी20 सामन्यात विजयाचं तोंड पाहावं लागलं होतं. या विजयाचा शिवम दुबे साक्षीदार होता. पण 38 सामन्यात शिवम दुबेचं काही लक चाललं नाही. खासकरून आशिया कप स्पर्धेतही टीम इंडियाने एकही सामना गमावला नव्हता.

शिवम दुबे प्लेइंग इलेव्हनमध्ये असताना भारताचा शेवटचा पराभव डिसेंबर 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. भारताने हा सामना त्रिवेंद्रम येथे खेळला होता. त्यानंतर विजयाची मालिका 2019 मध्ये सुरू झाली होती आणि आता 2025 मध्ये संपली आहे. शिवम दुबेसह जसप्रीत बुमराहची विजयाची मालिकाही खंडीत झाली आहे. बुमराह प्लेइंग 11 मध्ये असताना 24 सामन्यांची विजयी मालिका खंडीत झाली आहे. शिवम दुबेने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात फलंदाजीत 2 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या. तर जसप्रीत बुमराहा खांतही खोलू शकला नाही. धावचीत होत तंबूत परतावं लागलं. या सामन्यात शिवमने गोलंदाजी केली नाही. तर जसप्रीत बुमराहने 4 षटकात 26 धावा देत 2 विकेट काढल्या.

दुसऱ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकात सर्व गडी गमवून 125 धावा केल्या आणि विजयासाठी 126 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 13.2 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता तीन सामन्यांचा खेळ शिल्लक असून प्रत्येक सामना महत्त्वाचा असणार आहे.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.