Shubman Gill क्या बात है! शुभमनचा षटकार पाहून चाहते थक्क, बॉल आकाशात हरवला, पाहा व्हायरल VIDEO

शुभमन गिलने 98 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. 15व्या षटकात, हेडन वॉल्शनं चेंडू शुभमन गिलकडे टाकला ज्याची लांबी पाहून हा खेळाडू पुढे गेला आणि लाँग लांब षटकार मारला.

Shubman Gill क्या बात है! शुभमनचा षटकार पाहून चाहते थक्क, बॉल आकाशात हरवला, पाहा व्हायरल VIDEO
shubman gillImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 1:23 PM

नवी दिल्ली : टीम इंडियानं (Team India) एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा (WI) क्लीन स्वीप केला. त्रिनिदाद येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजचा 119 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 36 षटकांत 225 धावा केल्या. यानंतर पाऊस सुरू झाला आणि प्रत्युत्तरात विंडीजचा संघ 137 धावांत गारद झाला. भारताच्या विजयाचा हिरो म्हणून शुभमन गिल याची (Shubman Gill) निवड करण्यात आली. यानं नाबाद 98 धावा केल्या. गिलला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरविण्यात आलं. तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात गिलचं शतक हुकले असेल, पण त्याचा एक षटकार चर्चेचा विषय राहिला आहे. शुभमन गिलने 98 धावांच्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. या उजव्या हाताच्या फलंदाजानं षटकार मारला आणि नंतर 100 मीटर ओलांडून. 15व्या षटकात, हेडन वॉल्शनं चेंडू शुभमन गिलकडे टाकला ज्याची लांबी पाहून हा खेळाडू पुढे गेला आणि लाँग ऑनवर लांब षटकार मारला. गिलच्या बॅटला आदळल्यानंतर चेंडू आकाशात कुठेतरी गायब झाला आणि जेव्हा या षटकाराची लांबी पाहिली तर ती 104 मीटर होती. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

हा व्हिडीओ पाहा

गिलचे शतक हुकले

या सामन्यात शुभमन गिलला शतक झळकावण्याची संधी होती. पण नशीब त्याच्यासोबत नव्हतं. हा खेळाडू शतकापासून अवघ्या 2 धावा दूर असताना पाऊस आला आणि त्यानंतर भारतीय डावाची सुरुवातही होऊ शकली नाही. शुभमन गिल हा सचिन आणि सेहवाग यांच्यानंतरचा तिसरा भांतीय फलंदाज आहे जो 90 धावांवर नाबाद राहिला आणि आपले शतक पूर्ण करू शकला नाही. शतक हुकल्यावर शुभमन गिल म्हणाला, ‘मला शतकाची अपेक्षा होती पण पावसावर माझे नियंत्रण नाही. मला फक्त एक षटक हवे होते, ते अपेक्षित होते पण तसे झाले नाही.

मालिकावीर शुभमन

शुभमनची गिलची कामगिरी पाहता त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून घोषित करण्यात आलं. शुभमन गिलला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. उजव्या हाताच्या फलंदाजाने 3 डावात 102 पेक्षा जास्त सरासरीने 205 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतके झाली. गिलने एकदिवसीय संघात पुनरागमन केल्याचा चांगला फायदा घेतला आहे आणि आता तो बहुधा टीम इंडियामध्ये सतत राहणार आहे. या मालिकेत कर्णधार असलेल्या शिखर धवनने त्याची रोहित शर्माशी तुलना केली आणि त्याला त्याच वर्गातील खेळाडू म्हटले. दरम्यान, शुभमनच्या आकाशातील चेंडूचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.