भारताचा एक मोठा खेळाडू काऊंटी चॅम्पियनशिप खेळणार, ग्लॅमॉर्गन सोबत बोलणी सुरु

आधीच चेतेश्वर पुजारा ससेक्स, वॉशिंग्टन सुंदर लँकेशायर, क्रृणाल पंड्या, मोहम्मद सिराज दोघे (वॉरविकशायर), उमेश यादव (मिडलसेक्स) आणि नवदीप सैनी (केंट) संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहेत.

भारताचा एक मोठा खेळाडू काऊंटी चॅम्पियनशिप खेळणार, ग्लॅमॉर्गन सोबत बोलणी सुरु
CricketImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 3:45 PM

मुंबई: भारताचा आणखी एक मोठा खेळाडू काऊंटी क्रिकेट खेळायला जाणार आहे. त्याची इंग्लंड मधल्या काऊंटी क्लबसोबत बोलणी सुरु आहेत. आधीच भारताचे काही क्रिकेटपटू इंग्लंड मध्ये काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. टीम इंडियाचा टॉप ऑर्डरचा फलंदाज शुभमन गिल (Shubhaman Gill) काऊंटी चॅम्पियनशिप (County Championship) मध्ये खेळताना दिसणार आहे. ग्लॅमॉर्गन (Glamorgan) संघासोबत त्याची बोलणी सुरु आहेत. सर्वकाही व्यवस्थित जुळून आलं, तर यंदाच्या सीजन मध्ये काऊंटी क्रिकेट खेळणारा शुभमन गिल सातवा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. चेतेश्वर पुजारा ससेक्स, वॉशिंग्टन सुंदर लँकेशायर, क्रृणाल पंड्या, मोहम्मद सिराज दोघे (वॉरविकशायर), उमेश यादव (मिडलसेक्स) आणि नवदीप सैनी (केंट) संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि कोच रवी शास्त्री यांच्यानंतर ग्लॅमॉर्गन संघाकडून काऊंटी चॅम्पियनशिप खेळणारा शुभमन गिल तिसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. 1987 ते 1991 दरम्यान रवी शास्त्री ग्लॅमॉर्गन संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळले. सौरव गांगुली 2005 साली या संघाकडून खेळला. शुभमन गिल सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. वेस्ट इंडिज आणि नुकत्यात संपलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे सीरीज मध्ये शुभमन गिलने आपल्या फलंदाजीची क्षमता दाखवून दिली. त्याने खोऱ्याने धावा केल्या.

गिलने किती धावा केल्या?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत गिलने 102.50 च्या सरासरीने 205 धावा आणि झिम्बाब्वे विरुद्ध 122.50 च्या सरासरीने 245 धावा केल्या आहेत. नुकत्याच संपलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेत त्याने मालिकावीराचा पुरस्कार मिळवला. आयपीएल पासून शुभमन गिल दमदार फलंदाजी करतोय.

किती कसोटी सामने खेळलाय?

शुभमन गिल आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळलाय. त्यात त्याने 579 धावा केल्या आहेत. जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध बर्मिंघम मध्ये तो शेवटचा कसोटी सामना खेळला. त्याने दोन्ही डावात मिळून 17 आणि 4 धावा केल्या. भारताने हा सामना गमावला होता. घरच्या पंजाब संघाकडून तो 12 रणजी सामने खेळलाय. यात त्याने 65.33 च्या सरासरीने 1176 धावा केल्या आहेत. ग्लॅमॉर्गन डीविजन मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. 10 सामन्यात 5 विजय मिळवले आहेत. अजून त्यांचे चार सामने बाकी आहेत. कार्डीफ मध्ये 5 सप्टेंबरपासून वॉरसेस्टशायर विरुद्ध सीजनची सुरुवात करणार आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.