SL vs BAN : 6,6,6,6,6,6, दासुन शनाकाचं वादळी अर्धशतक, बांगलादेशसमोर 169 रन्सचं टार्गेट, श्रीलंका रोखणार?
Sri Lanka vs Bangladesh, Super 4 : माजी कर्णधार दासुन शनाका याने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर श्रीलंकेला 165 पार मजल मारता आली. दासूनने श्रीलंकेसाठी सर्वाधिक 64 रन्स केल्या.

दासुन शनाका याने केलेल्या स्फोटक आणि नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशसमोर 169 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. श्रीलंकेने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिेकेट स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 168 धावा केल्या आहेत. श्रीलंकेसाठी दासुनने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर पाथुम निसांका, कुसल मेंडीस, कॅप्टन चरिथ असलंका आणि कुसल परेरा या चौघांनीही योगदान दिलं. आता श्रीलंकेचे गोलंदाज बांगलादेशला रोखत सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करत सलग चौथा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
बांगलादेशने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेची कडक सुरुवात झाली. मात्र श्रीलंकेचा रनरेट मधल्या षटकांमध्ये पडला. श्रीलंकेला 7 ते 14 ओव्हरमध्ये काही खास करता आलं नाही. मात्र दासुन शनाका याने केलेल्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेच्या डावाचा शेवटही अप्रतिम केला. दासुन शनाका याने श्रीलंकेसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. शनाकाने शेवटपर्यंत नाबाद राहत श्रीलंकेला 168 धावांपर्यंत पोहचवलं.
श्रीलंकेची बॅटिंग
शनाकाने 37 बॉलमध्ये 172.97 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 64 रन्स केल्या. शनाकाने या खेळीत 6 षटकार आणि 3 चौकार ठोकले. शनाका व्यतिरिक्त ओपनर कुसल मेंडीस याने 25 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 34 रन्स केल्या. पाथुम निसांका याने 15 चेंडूत 22 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन चरिथ असलंका याने 21 धावा जोडल्या. चरिथ चांगला सेट झाला होता. मात्र चरिथ चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रन आऊट झाला. तर कुसल परेरा याने 100 च्या स्ट्राईक रेटने 16 बॉलमध्ये 16 रन्स केल्या.
बांगलादेश 169 धावा करणार?
Sri Lanka finish the innings strong at 168/7💥 Dasun Shanaka shines with a brilliant unbeaten 64* to lift the total. 🇱🇰🔥 #AsiaCup2025 #SLvBAN #SriLankaCricket pic.twitter.com/7x4nfs2bXY
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 20, 2025
श्रीलंकेचे फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी
दासुन व्यतिरिक्त श्रीलंकेच्या सेट झालेल्या फलंदाजांना मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र एकालाही त्या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. तर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. बांगलादेशसाठी एकूण 5 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी दोघे अपयशी ठरले. तर तिघे विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरले. बांगलादेशसाठी मुस्तफिजुरने सर्वाधिक विके्टस मिळवल्या. मुस्तफिजुरने 4 ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मेहदी हसन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर तास्किन अहमद याने 1 विकेट मिळवली.
