Sri Lanka vs Pakistan : बाबर आझमचा खतरनाक कॅच, क्रिकेट जगतात जोरदार चर्चा
babar Azam Catch : आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने धोकादायक फलंदाज दिनेश चांदिमलला माघारी पाठवलं. याचं पूर्ण श्रेय जात ते कर्णधार बाबर आझमला. बाबरने घेतलेल्या अप्रतिम कॅचचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

मुंबई : पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये यजमान श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये श्रीलंकेने 5 विकेट गमावत 226 धावा केल्या आहेत. पावसामुळे आता सामना थांबवला गेला असून शाहिन आफ्रिदीने जबरदस्त कमबॅक केलं आहे.
श्रीलंका संघाला जोरदार धक्के देत एकट्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर नसीम शहानेही काही कसर सोडली नाही. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्याने धोकादायक फलंदाज दिनेश चांदिमलला माघारी पाठवलं. याचं पूर्ण श्रेय जात ते कर्णधार बाबर आझमला. बाबरने घेतलेल्या अप्रतिम कॅचचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
बाबर आझमने घेतला अप्रतिम झेल
पाकिस्तानकडून युवा वेगवान गोलंदाज नसीम शाह 16 वी ओव्हर टाकत होता. त्यावेळी दुसऱ्याच चेंडूवर दिनेशच्या बॅटची कडा घेत चेंडू स्लीपच्या दिशेने गेला होता. त्यावेळी तिथे तैनात असलेल्या कर्णधार बार आझमने अप्रतिम कॅच घेतला. खरं तर तो कॅच त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या खेळाडूच्या दिशेने गेला होता. मात्रच चपळतेने बाबरने उडी घेत चेंडू पकडला.
पाहा व्हिडीओ :-
Beauty from Naseem Shah and an excellent catch from Babar Azam??. #BabarAzam #NaseemShah #SLvPAK #PAKvSL pic.twitter.com/rCQEzVEoTr
— Shaharyar Ejaz ? (@SharyOfficial) July 16, 2023
दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील कसोटी सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत 226-5 धावसंख्या झाली असून धनंजया डी सिल्वा नाबाद 64 आणि सदीरा समरविक्रमा नाबाद 25 धावांवर खेळत आहे. पाकिसान संघाकडून शाहिन आफ्रिदी सर्वाधिक 3 विकेट्स तर नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (C), सौद शकील, सर्फराज अहमद (W), आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने (C), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा (W), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, कसून रजिथा
