AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka vs Pakistan : एक वर्षानंतर कमबॅक, दुसऱ्याच ओव्हरमध्ये शाहिनशाह आफ्रिदीने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास

Shaheen Afridi Record : एक वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट घेत इतिहास रचला आहे.  हिल्या कसोटी सामन्यामध्ये आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला धक्का देत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Sri Lanka vs Pakistan : एक वर्षानंतर कमबॅक, दुसऱ्याच ओव्हरमध्ये शाहिनशाह आफ्रिदीने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास
| Updated on: Jul 16, 2023 | 7:58 PM
Share

मुंबई | 16 जुलै : पाकिस्तान संघाचा हुकमी एक्का असलेल्या शाहिनशाह आफ्रिदीने दुखापतीनंतर दमदार कमबॅक केलं आहे. एक वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरणाऱ्या आफ्रिदीने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये विकेट घेत इतिहास रचला आहे. नवा चेंडू स्विंग करण्यासाठी आफ्रिदी ओळखला जातो. अशातच आता सुरू असलेल्याा श्रीलंका आणि पाकिस्तान पहिल्या कसोटी सामन्यामध्ये आफ्रिदीने श्रीलंकेला पहिला धक्का देत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

शाहिद आफ्रिदीने कोणता विक्रम रचलाय?

पहिल्या कसोटीमध्ये श्रीलंका संघ फलंदाजीला उतरला आहे. सामन्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये शाहिन आफ्रिदीने सलामीवीर निशान मदुष्काला आऊट करत पहिला धक्का दिला. अवघ्या 4 धावा काढून निशानला माघारी परतावं लागलं. या विकेटसह शाहिनशाह आफ्रिदीने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 100 विकेट पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी कसोटीमध्ये 100 विकेटस घेणारा तो 19 वा गोलंदाज ठरला आहे.

आफ्रिदीने ऑक्‍टोबरमध्ये गेल्या वर्षी ऑस्‍ट्रेलियामध्‍ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पुनरागमन केलं होतं. मात्र फायनल सामन्याआधी गुडघ्याच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता. यामुळे आफ्रिदीला इंग्‍लंड आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेमधून बाहेर पडला होता.

दरम्यान, श्रीलंका आणि पाकिस्तानमधील कसोटी  सामना पावसामुळे थांबवण्यात आला आहे. आतापर्यंत 226-5 धावसंख्या झाली असून धनंजया डी सिल्वा नाबाद 64 आणि सदीरा समरविक्रमा नाबाद 25 धावांवर खेळत आहे. पाकिसान संघाकडून शाहिन आफ्रिदी सर्वाधिक 3 विकेट्स तर नसीम शाह आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): दिमुथ करुणारत्ने (C), निशान मदुष्का, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, दिनेश चंडिमल, सदीरा समरविक्रमा (W), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, कसून रजिथा

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, शान मसूद, बाबर आझम (C), सौद शकील, सर्फराज अहमद (W), आगा सलमान, नौमान अली, अबरार अहमद, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.