Ayush Mhatre : आयुष म्हात्रे याचा तडाखा, शतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी, रोहित शर्माला पछाडलं
Ayush Mhatre World Record : आयुश म्हात्रे याने विदर्भाच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. आयुषने केलेल्या शतकी खेळीमुळे भारताने विदर्भावर सहज वीज साकारला. आयुषने या शतकासह रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत मुंबईने रेल्वेनंतर विदर्भ क्रिकेट टीमला पराभूत करत सलग दुसरा विजय मिळवला. विदर्भाने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 13 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईने 17.5 ओव्हरमध्ये 194 धावा केल्या. युवा आयुष म्हात्रे हा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. आयुषने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. आयुषने विजयी धावांचा पाठलाग करताना शतक झळकावलं. आयुषने विदर्भ विरुद्ध या शतकी खेळी दरम्यान चौफेर फटकेबाजी केली. वैभवने या खेळीसह भारताच्या विजयाचा पाया रचला. इतकंच नाही तर ओपनिंगला आलेल्या वैभव मुंबईला विजयी करुन नाबाद परतला. आयुषने यासह रोहित शर्मा याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
आयुषने अवघ्या 53 चेंडूत 207.55 च्या स्ट्राईक रेटने 110 धावा केल्या. आयुषने या दरम्यान 8 चौकार आणि तितकेच अर्थात 8 षटकार लगावले. आयुषने या दरम्यान शतक झळकावताच इतिहास घडवला. आयुष देशांतर्गत क्रिकेटमधील तिन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला. आयुषने सर्वात कमी वयात फर्स्ट क्लास, टी 20 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक करण्याचा बहुमान मिळवला. आयुषने यासह रोहित शर्मा याला मागे टाकलं.
आयुष म्हात्रे अवघ्या काही महिन्यांपूर्वी 18 वर्षांचा झाला. आयुषने वयाच्या 18 वर्ष 135 व्या दिवशी टी 20 शतक झळकावलं. आयुष यासह लिस्ट ए, टी 20 आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये शतक करणारा युवा फलंदाज ठरला. तर रोहितने वयाच्या 19 वर्ष 339 व्या दिवशी ही कामगिरी केली होती.
आयुषची फर्स्ट क्लास कामगिरी
आयुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आयुषने 13 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 660 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 2 शतकं आणि 2 अर्धशतकं केली आहेत. तसेच आयुषने 7 लिस्ट ए सामन्यांमध्ये 458 धावा जोडल्या आहेत. तर मुंबईच्या या युवा फलंदाजाने टी 20 क्रिकेटमध्ये 1 शतकासह 368 धावा केल्या आहेत.
आयुषने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र आयुषला आयपीएलमुळे मोठं व्यासपीठ मिळालं. आयुषने 18 व्या मोसमातून पदार्पण केलं. चेन्नई सुपर किंग्सने या युवा खेळाडूला संधी दिली. आयुषनेही या संधीचं सोनं केलं. आयुषने एकूण 7 सामन्यांमध्ये खेळताना चेन्नई सुपर किंग्ससाठी 240 धावा केल्यात.
