AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्वार्डने झुंजार खेळी केली. पण संघाला पराभवातून वाचवू शकली नाही. पण तिने स्पर्धेत केलेल्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली खेळीची दखलImage Credit source: PTI
| Updated on: Nov 12, 2025 | 7:25 PM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. भारताने विजयीसाठी 298 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र हे आव्हान गाठताना सर्व गडी गमवले आणि 52 धावा कमी पडल्या. अंतिम फेरीत एकीकडे धडाधड विकेट पडत असताना दक्षिण अफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्वार्ड झुंज देत होती. मात्र तिची विकेट पडली आणि विजयाच्या आशा मावळल्या. लॉराने अंतिम फेरीतच नाही तर संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या आठ सामन्यात तिने 67.14 च्या सरासरीने 97.91 च्या स्ट्राईक रेटने 470 धावा केल्या. यात उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक ठोकलं. लॉराच्या या खेळीमुळे क्रीडाप्रेमीही तिचं कौतुक करत आहेत. आता तिच्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली असून तिला खास भेट दिली आहे. लॉरा वॉल्वार्डला ऑक्टोबर 2025 स्पर्धेचा वुमन्स प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार जाहीर करून गौरव केला आहे.

आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाल्यानंतर लॉरा वॉल्वार्डने आनंद व्यक्त केला आहे. लॉराने सांगितलं की, “भारतात झालेल्या वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत संघाच्या कामगिरीनंतर हा पुरस्कार जिंकणे ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट सामने आणि उत्कृष्ट कामगिरी झाली. स्पर्धा जिंकणे ही मोठी गोष्ट असली तरी, आम्हाला आमच्या विजयाचा आणि आम्ही दाखवलेल्या अढळ भावनेचा अभिमान आहे. आम्हाला विश्वास आहे की आयसीसी वर्ल्डकप विजेतेपद आमच्या आवाक्यात आहे. मी सर्वांच्या पाठिंब्याची प्रशंसा करते आणि मैदानावर तुम्हाला अभिमानित करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन.”

भारत आणि दक्षिण अफ्रिका अंतिम सामना

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण अफ्रिका आमनेसामने आले होते. नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. भारताने फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या आणि विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 246 धावांवर बाद झाला. या सामन्यात भारताने 52 धावांनी विजय मिळवला. आता पुढच्या वर्षी टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवतं याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...