AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 मध्ये सुपरस्टार बनू शकणाऱ्या भारतीय खेळाडूच नाव सुनील गावस्करांकडून जाहीर

एक भारतीय प्लेयर यंदाचा IPL 2024 चा सीजन गाजवू शकतो. सुनील गावस्कर यांनी या सीजनसाठी एकूण दोन प्लेयरची नाव घेतली आहेत. आयपीएलचा 17 वा हंगाम सुरु झाला आहे. काल गतविजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना झाला.

IPL 2024 मध्ये सुपरस्टार बनू शकणाऱ्या भारतीय खेळाडूच नाव सुनील गावस्करांकडून जाहीर
sunil gavaskar
| Updated on: Mar 23, 2024 | 11:44 AM
Share

यंदाच्या आयपीएलमध्ये एक भारतीय खेळाडू आपल्या परफॉर्मन्सने सुपरस्टार बनू शकतो. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी त्या खेळाडूच नाव जाहीर केलय. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलताना गावस्करांनी एक नाही, दोन खेळाडूंची निवड केलीय. यंदाच्या आयपीएलमध्ये आपल्या परफॉर्मन्सने हे खेळाडू एक्स फॅक्टर ठरु शकतात, असं गावस्कर यांचं मत आहे. गावस्कर यांनी ध्रुव जुरेलच नाव घेतलय. त्याला भारताच नवीन सुपरस्टार ठरवलय. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये जुरेलची विकेटकीपिंग आणि फलंदाजी पाहून गावस्कर यांनी ध्रुव जुरेल भारताचा नवीन धोनी असल्याच म्हटलं होतं. यंदाच्या आयपीएलमध्ये ध्रुव जुरेलच्या कामगिरीवर नजर असेल.

“इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये जुरेलने स्वत:ला सिद्ध केलय. आता आयपीएलमध्ये त्याला जास्त संधी मिळतील. तो फलंदाजीला वरच्या क्रमांकावर येऊ शकतो. आपल्या टीमसाठी जुरेल एक्स फॅक्टर ठरु शकतो” असं गावस्कर म्हणाले. सुनील गावस्कर यांनी आकाशदीपच सुद्धा नाव घेतलं. इंग्लंड विरुद्ध आपला पहिलाच कसोटी सामना खेळताना आकाशदीपने आपल्या गोलंदाजीने फॅन्स आणि माजी दिग्गजांना हैराण केलं. आता गावस्कर यांनी आकाशदीपबद्दल भविष्यवाणी करुन फॅन्समध्ये खळबळ उडवून दिलीय.

दुसरा प्लेयर कुठल्या टीमकडून खेळणार?

ध्रुव जुरेल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. आकाशदीप RCB कडून खेळणार आहे. काल आयपीएलच्या 17 व्या सीजनमधील पहिला सामना झाला. चेन्नई सुपर किंग्सने विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.