AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादच्या अडचणीत वाढ, नव्याने सामिल धाकड खेळाडूची स्पर्धेतून माघार, पितृशोकामुळे मायदेशी परतणार

पहिल्या पर्वात गुणतालिकेत तळाला असणाऱ्या सनरायजर्स हैद्राबाद संघाची दुसऱ्या पर्वाची सुरुवातही खराब झाली आहे. पहिल्याच सामन्यात दिल्लीने त्यांना नमवले असून आता त्यांच्या एका धाकड खेळाडूनेही स्पर्धेतून माघार घेतली आहे.

IPL 2021: सनरायजर्स हैद्राबादच्या अडचणीत वाढ, नव्याने सामिल धाकड खेळाडूची स्पर्धेतून माघार, पितृशोकामुळे मायदेशी परतणार
शेरफान रुदरफॉर्ड
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 9:51 PM
Share

IPL 2021: युएईत सुरु असलेल्या आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) संघाची अवस्था आधीच बिकट असताना त्यांना एक मोठा झटका बसला आहे. उर्वरीत पर्वासाठी जॉनी बेयरस्टोच्य़ा जागी संघात सामिल झालेला धाकड फलंदाज शेरफान रदरफॉर्ड (Sherfane Rutherford) स्पर्धेतून माघात घेत आहे. त्याच्या वडिलांच निधन झाल्यामुळे रदरफॉर्ड आयपीएल 2021 मध्येच सोडून मायदेशी परतणार आहे. वेस्ट इंडीज संघाचा क्रिकेटर असणारा रुदरफोर्ड यंदा पहिल्यांदाच हैद्राबाद संघात सामिल झाला होता. याआधी को मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता.

सनरायजर्स हैद्राबादने रदरफॉर्ड यांच्या स्पर्धेतून माघार घेण्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली. त्यांनी लिहिलं आहे की, ‘सनरायजर्स हैद्राबाद कुटुंब मनापासून शेरफान रदरफॉर्ड आणि त्याच्या कुटुंबाप्रति संवेदनशील आहे. शेरफानच्या वडिलांच निधन झालं आहे. शेरफान या कठीण समयी कुटुंबासोबत राहण्यासाठी बायोबबल सोडून कुटुंबाकडे परतत आहे.”

आयपीएल आणि रुदरफोर्ड

याआधी रुदरफोर्ड आयपीएल 2019 मध्ये मुंबई संघामध्ये होता.  त्याने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. ज्यात 73 धावा केल्या आहेत. त्याने हे सर्व सामने 2019 च्या आयपीएलमध्ये खेळले होते. तर त्याआधी 2018 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्स संघात होता. पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. 2018 मध्ये त्याला वेस्टइंडीज संघाकडून बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात टी20 संघात स्थान मिळालं होतं. तेव्हा त्याने सहा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 43 रन केले होते.

हे ही वाचा

MI vs KKR: हिटमॅन रोहित शर्मा आयपीएलमध्येही ‘हिट’, कोणालाही न जमलेला रेकॉर्ड केला नावावर

T20 World Cup चे Theme Song तयार, विराट-पोलार्डसह राशिद-मॅक्सवेल नव्या अवतारात, पाहा VIDEO

IPL 2021 : वैयक्तिक आयुष्यात धक्के, पण बॅट मात्र तळपतीच, प्रत्येक हंगामात शिखरकडून रन्सचा पाऊस, प्रतिस्पर्ध्यांना धसका!

(sunrisers hyderabad player sherfane rutherford father passed away he will leave ipl 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.