AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup, IND vs USA : भारत अमेरिकेच्या या खेळाडूंकडे असेल सामन्याची चावी, जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि अमेरिका हे दोन संघ आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना असून विजयी संघाला थेट प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंमध्ये सामना फिरवण्याची ताकद आहे. चला जाणून घेऊयात

T20 World Cup, IND vs USA : भारत अमेरिकेच्या या खेळाडूंकडे असेल सामन्याची चावी, जाणून घ्या
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 11, 2024 | 6:49 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात होत आहे. दोन्ही संघांची अ गटात चांगली कामगिरी राहिली आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यात दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. आता साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. या सामन्यातील विजयी संघाला थेट सुपर 8 चं तिकीट मिळणार आहे. तसं पाहिलं तर या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण अमेरिकेला हलक्यात घेणं भारताला महागात पडू शकते. पहिल्याच सामन्यात अमेरिकेने मोठा उलटफेर करत पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजलं. धावसंख्येची बरोबरी केली तसेच सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं. त्यामुळे अमेरिकन संघ वाटतो तितका साधा नाही हे देखील तितकंच खरं आहे. त्यामुळे भारताला ताकही फुंकून प्यावं लागेल. कारण या स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काँउटी मैदानात भारत अमेरिका हा सामना होणार आहे. याच मैदानात भारतीय संघ मागचे दोन सामने खेळला होता.

सुपर 8 साठीच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या सहा, अमेरिकेच्या पाच खेळाडूंवर नजर असणार आहे. या सामन्यात हार्दिक पांड्याकडून खूपच अपेक्षा आहेत. खेळपट्टी धीमी असल्याने धावसंख्या 150 च्या आतच राहील ही आशंका आहे. त्यामुळे मधल्या फळीत फटकेबाजीसह चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा आहे. भारताकडून हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. तर अमेरिकेकडून मोनांक पटेल, आरोन जोन्स, कोरी अँडरसन, स्टीव्हन टेलर आणि सौरभ नेत्रावळकर हे चांगली कामगिरी करू शकतात.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

अमेरिका : स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल (कर्णधार/विकेटकीपर), अँड्रिज गॉस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉस्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान.

मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार
मुंबई हादरली! बाप झाला हैवान, मुकबधीर मुलीवर अत्याचार.
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ
सुनेत्रा पवारांचा बॅनरवरून फोटो गायब; रायगडमधील प्रकाराने खळबळ.
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे.
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका.
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!.
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार.