Matthew Wade ला अंपायरशी भिडणं अंगलंट, आयसीसीने उचललं मोठं पाऊल

Icc T20 World Cup 2024: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एका फलंदाजाने बॅटिंग दरम्यान पंचांसोबत हुज्जत घातल्याने आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

Matthew Wade ला अंपायरशी भिडणं अंगलंट, आयसीसीने उचललं मोठं पाऊल
icc world cup trophy
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 9:03 PM

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 17 वा सामना शनिवारी 8 जून रोजी खेळवण्यात आला.  ऑस्ट्रेलियाने गतविजेत्या इंग्लंडचा  36 धावांनी पराभव करत सलग दुसरा विजय मिळवला.  इंग्लंड विरुद्धच्या या प्रतिष्ठेच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर बॅट्समन मॅथ्यू वेड याने अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत हुज्जत घातली होती. मॅथ्यू हेडला अंपायरसह हुज्जत घालणं चांगलंच महागात पडलं आहे. मॅथ्यू हेडकडून या दरम्यान नियमांचं उल्लंघन झालं. त्यामुळे आयसीसीने हेडवर कारवाईचा बडगा उचलला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

मॅथ्यू वेडकडून या नियमाचं उल्लंघन

इंग्लंडच्या आदिल रशीद याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील 18 वी ओव्हर टाकली. रशीदच्या या ओव्हरमधील एका बॉलवर मॅथ्यूने खेळण्यास नकार दिला. रशीदने बॉल टाकण्याआधी मॅथ्यूने त्याला हात दाखवत मी खेळण्यासाठी असमर्थ असल्याचं इशाऱ्याने सांगितलं. मात्र राशिदने टाकलेला बॉल मॅथ्यू सोडण्याऐवजी खेळला. त्यानंतर मॅथ्यूला हा बॉल डेड असल्याचं जाहीर होईल, असं अंपायरकडून अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. त्यामुळे मॅथ्यूने अंपायरसह हुज्जत घातली आणि नाराजी व्यक्त केली.

मॅथ्यू वेडकडून खेळाडू आणि खेळाडूंसंबंधितांसाठी आयसीसीच्या 2.8 च्या नियमांचं उल्लंघन झालं. या नियमाममध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयावरुन असहमती दर्शवण्याची तरतूद आहे. मॅथ्यूला नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट देण्याच आला आहे. मॅथ्यूची गेल्या 2 वर्षातील ही पहिलीच वेळ होती. मॅथ्यूने आपली चूक असल्याचं कबूल केलं. दरम्यान ऑस्ट्रेलिया आपला पुढील सामना हा 12 जून रोजी नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. विवियन रिचर्ड्स स्टेडियम, एटींग्वा येथे होणार आहे

मॅथ्यू वेडला शहाणपणा भोवला, आयसीसीकडून कारवाई

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम : मिचेल मार्श (कॅप्टन), डेविड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, टीम डेविड, मार्कस स्टोयनिस, कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, एश्टन एगर, एडम झॅम्पा, पॅट कमिंस, जोश हेजलवुड, मिचेल स्टार्क आणि नाथन एलिस.

राखीव : जेक फ्रेजर – मॅकगर्ग आणि मॅट शॉर्ट.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.