
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी उतरली. संजू सॅमसन स्ट्राईकला होता. या षटकातील पहिले तीन चेंडू निर्धाव गेले. त्यानंतरच्या चेंडूवर संजू सॅमसनने जोरदार प्रहार केला आणि षटकार मारला. हा षटकार मारताच संजू सॅमसनच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामन्यात पहिल्या षटकात षटकार मारणारा नंबर 1 खेळाडू ठरला आहे. संजू सॅमसनने टी20 वर्ल्डकपच्या चारही सामन्यातील पहिल्या षटकात षटकार मारला आहे. इतकंच काय तर त्याने इंग्लंडचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्टचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत 40 चेंडूत हा कारनामा केला होता. यासाठी संजू सॅमसनने फक्त 21 चेंडू घेतले.
संजू सॅमसन आणि फिल सॉल्टसह अफगाणिस्तानच्या रहमनतुल्लाह गुरबाजने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तीन वेळा षटकार मारले होते. मोहम्मद रिझवान आणि क्विंटन डिकॉक यांनीही तीनवेळा अशी कामगिरी केली आहे. पण संजू सॅमसनने चार सामन्यात अशी कामगिरी केल्याने त्यांच्या पुढे निघून गेला आहे. संजू सॅमसनने या स्पर्धेत पहिला सामना नामिबियाविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याने पहिल्या षटकात षटकार मारला होता. त्यानंतर झिम्बाब्वेविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
दुसरीकडे, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून दिली आहे. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील ही भारतीय ओपनर्सकडून सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी या जोडीने झिम्बाब्वेविरुद्ध 48 धावांची भागीदारी केली होती. पण अंतिम सामन्यात या जोडीने मोठी भागीदारी करत टीम इंडियावरचं फलंदाजीचं दडपण काही अंशी दूर केलं आहे. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 धावांची खेळी केली.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पॉवर प्लेमध्ये 92 धावा केल्या. हा देखील विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजने 2024 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध केला होता. तेव्हा त्यांनी एक विकेट गमवली होती.