AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup Semi Final 1 live streaming: सेमीफायनलची पहिली लढत न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना

T20 World Cup: विश्वचषकातील अखेरचे 3 सामने शिल्लक आहेत. यात दोन सेमीफायनलचे सामने असून जिंकणारे संघ फायनलमध्ये एकमेकांशी भिडतील. तर पहिली सेमीफायनल आज इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवली जाणार आहे.

T20 World Cup Semi Final 1 live streaming: सेमीफायनलची पहिली लढत न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल सामना
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 7:52 AM
Share

दुबई: यंदाचा  टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होत असून आज पहिली लढत ग्रुप 1 मधून आलेल्या इंग्लंड आणि ग्रुप 2 मधून आलेल्या न्यूझीलंड यांच्यात पार पडणार आहे.  न्यूझीलंडच्या संघाने सुपर 12 फेरीत  5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह ही फेरी गाठली आहे. त्यांना फक्त पाकिस्तानला मात देता आली नाही. तर दुसरीकडे ग्रुप 1 मधून आलेल्या इंग्लंडनेही 5 पैकी 4 सामने जिंकत 8 गुणांसह सेमीफायनल गाठली आहे. त्यांना फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकमेव पराभव पत्करावा लागला होता.

दोन्ही संघाचं यंदाच्या स्पर्धेतील प्रदर्शन तसं उत्तम आहे. त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. दरम्यान दोन्ही संघातील विजेता संघ हा अंतिम फेरीत पोहोचणार आहे. हा संघ उद्याच्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील विजेत्या संघासोबत 14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळेल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलचा सामना कधी खेळवला जाईल?

टी – 20 विश्वचषकातील पहिला सेमीफायनलचा सामना आज बुधवारी (10 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी खेळवला जाईल. नाणेफेक 7 वाजता होणार आहे.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामना कुठे खेळवला जाईल?

न्यूझीलंड आणि इंग्लंड  यांच्यातील आजचा टी -20 सामना अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर खेळवला जाईल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड  यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे होईल?

आजच्या विश्वचषकातील पहिला सेमीफायनल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 3) हिंदी आणि इंग्रजी भाषेत थेट प्रसारित केला जाईल.

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग कोठे होईल?

या सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्‍ट्रीमिंग डिस्ने+ हॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकता

संभाव्य न्यूझीलंड संघ: केन विल्यमसन (कर्णधार), डॅरील मिचेल, मार्टीन गप्टील, जेम्स निशम, डेवॉन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोढी, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट, अॅडम मिल्ने.

संभाव्य इंग्लंड संघ: जोस बटलर, डेविड मलान, जॉनी बयरस्टो,  इयॉन मॉर्गन (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड विली, मोईन अली, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद, मार्क वुड,

इतर बातम्या

मोठी बातमी: टी20 संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ जाहीर

T20 World Cup: ‘हा’ आहे भारत, ‘हे’ आहे भारताचं क्रिकेटबद्दलचं प्रेम, नामिबीयाविरुद्धच्या सामन्या पंतचा ‘तो’ VIDEO व्हायरल

मोठ्या वादात अडकला शोएब अख्तर, अचानक टीव्ही शो सोडणं पडलं महागात, चॅनेलने ठोकला 100 मिलीयनचा दावा

(T20 world cup Semi final 1 between New zealand vs England live streaming when and where to watch online match)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.