PAK vs SL : श्रीलंका पाकिस्तानचा हिशोब करत फायनलमध्ये पोहचणार? सामना केव्हा?
Pakistan vs Sri Lanka Live Streaming : पाकिस्तामध्ये होत असलेल्या टी 20I ट्राय सीरिजमधील अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोण असणार? या प्रश्नाचं उत्तर 27 नोव्हेंबरला मिळणार आहे. श्रीलंकेसाठी हा सामना करो या मरो असा आहे.

पाकिस्तानमध्ये आयोजित टी 20i ट्राय सीरिजमधील सहाव्या आणि अंतिम सामन्यात यजमान संघासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. पाकिस्ताने सलग 3 सामने जिंकून आधीच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर एका जागेसाठी झिंबाब्वे आणि श्रीलंका यांच्यात चुरस आहे. झिंबाब्वेने 4 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर श्रीलंकेने 3 पैकी 1 सामना जिकंला आहे. त्यामुळे अंतिम फेरीसाठी अजूनही झिंबाब्वे आणि श्रीलंकेच्या आशा कायम आहेत. मात्र झिंबाब्वेचं अंतिम फेरीचं समीकरण हे दुसऱ्यांच्या हातात आहे. तर श्रीलंकेकडे स्वत:च्या जोरावर अंतिम फेरीत पोहचण्याची संधी आहे.
पाकिस्तान-श्रीलंका सामन्याकडे झिंबाब्वेचं लक्ष
श्रीलंकेने पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवला तर ते अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. मात्र पाकिस्तानने सामना जिंकल्यास झिंबाब्वे फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यात दासुन शनाका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान आघा याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.
पाकिस्तान-श्रीलंका सामना केव्हा?
पाकिस्तान-श्रीलंका सामना गुरुवारी 27 नोव्हेंबरला होणार आहे.
पाकिस्तान-श्रीलंका सामना कुठे?
पाकिस्तान-श्रीलंका सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी इथे होणार आहे.
पाकिस्तान-श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार?
पाकिस्तान-श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.
पाकिस्तान-श्रीलंका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
पाकिस्तान-श्रीलंका सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर लाईव्ह मॅच स्पोर्ट्स टीव्ही या यूट्युब चॅनेलवर पाहता येईल.
श्रीलंका पराभवाची परतफेड करणार?
दरम्यान श्रीलंका-पाकिस्तान दोन्ही संघांची साखळी फेरीत आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी पाकिस्तानने श्रीलंकेला 22 नोव्हेंबरला 7 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे श्रीलंकेकडे हा सामना जिंकून पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
अंतिम सामना केव्हा आणि कधी कुठे?
दरम्यान पाकिस्तान या मालिकेत अजिंक्य आहे. पाकिस्तान 3 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे पाकिस्तानकडे गुरुवारी श्रीलंकेला पराभूत करत विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर श्रीलंकेचं अंतिम फेरीत पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेने हा सामना जिंकल्यास पुन्हा एकदा हे दोन्ही संघ अंतिम फेरीत एकत्र खेळताना दिसतील. अंतिम सामना हा शनिवारी 29 नोव्हेंबरला रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
