T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!

Team India T20i World Cup 2026 Semi final Qualification : टीम इंडियाने साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली. मात्र सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यातील पराभवामुळे सेमी फायनलच्या हिशोबाने अडचणी वाढल्या आहेत.

T20i World Cup 2026 : भारतावर सेमी फायनलमधून आऊट होण्याची टांगती तलवार, सूर्यासेनेच्या स्थितीला तिघे जबाबदार!
Suryakumar Yadav Team India Huddle Talk
Image Credit source: Bcci
| Updated on: Feb 25, 2026 | 3:21 AM

साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या टीम इंडियावर सुपर 8 फेरीतील पहिल्या पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकून रुबाबात सुपर 8 मध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी साखळी फेरीतील 4 सामन्यात वेगवेगळे खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरले. यावरुन टीम इंडिया विजयासाठी कोणत्या एका खेळाडूवर अवलंबून नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही धमाकेदार कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा गेम झाला.

रविवारी 22 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील पहिल्या सामन्यासाठी 2024 वर्ल्ड कप स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता आमनेसामने होते. दक्षिण आफ्रिकेने भारतावर 76 धावांच्या मोठ्या फरकाने मात करत सलग पाचवा विजय मिळवला. टीम इंडियाला त्यामुळे दुहेरी फटका बसला. टीम इंडियाला पराभवासह नेट रनरेटमध्येही जबर फटका बसला. त्यामुळे टीम इंडियाचं सेमी फायनलचं समीकरण फिस्कटलं आहे. त्यामुळे टीम इंडियाला इथून एकही चुक परवडणारी नाही. तसेच भारताला सेमी फायनलमध्ये मोठ्या फरकाने जिंकावं लागणार आहे. मात्र टीम इंडिया इतकी अडचणीत कशी आली? या परिस्थितीला टीम इंडियाचे 3 खेळाडू जबाबदार आहेत. टीम इंडियाच्या त्या 3 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

अभिषेक शर्माची हॅट्रिक

अभिषेक शर्मा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग 3 वेळा झिरोवर आऊट झाला. अभिषेक टी 20i वर्ल्ड कप पदार्पणातील सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्यानंतर अभिषेकला नामिबिया विरूद्धच्या सामन्यात मुकावं लागलं. त्यानंतर पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरुद्धच्या सामन्यात अभिषेक झिरोवर आऊट झाला. अभिषेक शर्माने या स्पर्धेतील 4 सामन्यांत 15 धावाच केल्या आहे.

तिलक वर्मा

टीम इंडियाच्या डावखुऱ्या तिलक वर्मा याने आशिया कप फायनलमध्ये चाबूक खेळी करुन टीम इंडियाला चॅम्पियन केलं होतं. मात्र तिलकच्या बॅटिंगची धार वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीशी झाली. तिलकने आतापर्यंत 5 सामन्यांत 107 धावा केल्या. तिलकला 5 पैकी एका सामन्यातही शतक करता आलेलं नाही. अभिषेकने या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्य 10 व्या पर्वात 21.40 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे तिलक त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं.

ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर

वॉशिंग्टन सुंदर याला दुखापतीनंतर सुपर 8 फेरीतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून संधी देण्यात आली. सुंदरसाठी उपकर्णधार अक्षर पटेल याला बाहेर बसवण्यात आलं. मात्र सुंदरने बॉलिंगसह बॅटिंगनेही निराशा केली. सुंदरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फक्त 11 धावा केल्या. सुंदरने त्या सामन्यात पाचव्या स्थानी बॅटिंग केली. तर सुंदरला 1 विकेटही मिळवता आली नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंट भारताच्या सुपर 8 मधील दुसऱ्या सामन्यासाठी काय आणि किती बदल करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.