AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली याची बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी मोठी घोषणा, नक्की काय?

Virat Kohli : न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहली याने त्याआधी मोठी घोषणा केली आहे.

Virat Kohli : विराट कोहली याची बॉर्डर गावसकर ट्रॉफीआधी मोठी घोषणा, नक्की काय?
virat kohliImage Credit source: Virat Kohli X Account
| Updated on: Nov 07, 2024 | 10:43 PM
Share

टीम इंडियाला मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3-0 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 3 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका (बॉर्डर गावस्कर ट्रॉफी) खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावरुन मोठी घोषणा केली आहे. विराटने एक्स या सोशल मीडिया या प्लॅटफॉर्मवरुन सर्वांसोबत काय शेअर केलंय? हे जाणून घेऊयात.

विराटने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी टीम बदलली आहे. विराटनेच ही घोषणा केली आहे. विराटला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे विराटवर सडकून टीका करण्यात आली होती. त्यानंतर विराटने ही घोषणा केली आहे. विराटने गुरुवारी 7 नोव्हेंरबरला सोशल मीडियावरुन पोस्ट करत मॅनेजमेंट टीमससोबत नवी सुरुवात करत असल्याचं सांगितलं आहे. विराटने बिझनेससाठी स्पोर्टिंग बियॉन्डसह (Sporting Beyond) जोडल्याचं म्हटलं आहे.

विराटने पोस्टमध्ये काय म्हटलं?

“मी माझी टीम ‘स्पोर्टिंग बियॉन्ड’सोबत नव्या सुरुवातीची घोषणा करताना उत्साहित आहे. ही कंपनी गेल्या काही काळापासून माझ्यासह कार्यरत आहे. स्पोर्टिंग बियॉन्ड टीम माझी उद्दिष्टं, पारदर्शकतेची माझी मूल्यं, प्रामाणिकपणा आणि खेळावरील प्रेम या मूल्यांना सामायिक करते. माझ्यासाठी हा एक नवा अध्याय आहे, कारण मी माझ्या नव्या टीमसोबत भागीदारीची प्रतिक्षा करतोय, जे माझ्या सर्व व्यावसायिक हितसंबंधांवर माझ्यासोबत काम करेल”, असं विराटने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय.

विराटला मिळाली नवी ‘टीम’

विराटची गेल्या 3 सामन्यांमधील कामगिरी

दरम्यान विराट याने गेल्या 3 कसोटी सामन्यांमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागल्याचं स्पष्ट झालं आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांमधील 6 डावात 93 धावा केल्या. विराटला या मालिकेत केवळ 1 अर्धशतकी खेळीच करता आली. विराटने बंगळुरु कसोटीत 70 धावा केल्या. तर विराटला 4 डावांमध्ये दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे विराटसमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धावा करण्याचं आव्हान असणार आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.