Video | संयमी राहुल द्रविड इतका का भडकला? तो खरंच भडकला की नाटक करत होता? पडद्यामागे काय घडलं? पाहा व्हिडीओ

राहुल द्रविडने (Rahul Dravid) या जाहिरातीत केलेला (cred advertise) अभिनय चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. दरम्यान आता या जाहिरातीतील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ (behind the scenes) सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Video | संयमी राहुल द्रविड इतका का भडकला? तो खरंच भडकला की नाटक करत होता? पडद्यामागे काय घडलं? पाहा व्हिडीओ
राहुल द्रविडने (Rahul Dravid) या जाहिरातीत केलेला (cred advertise) अभिनय चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. दरम्यान आता या जाहिरातीतील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ (behind the scenes) सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 10:57 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडचा (Rahul Dravid) चारचाकीचा तोडफोड करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर द्रविड खरच इतका संतापू शकतो, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र हा व्हिडीओ खरा नसून ती एक जाहिरात असल्याचं समोर आलं. या जाहीरातीनंतर राहुल द्रविड सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. ही जाहिरात लोकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. दरम्यान ही जाहिरात सुपरहिट झाल्यानंतर क्रेडने या जाहीरातीच्या शूटिंगदरम्यानचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये द्रविडला ही भूमिका करण्यात फार संघर्ष करावा लागल्याचं दिसून येत आहे. (team india former captain rahul dravid cred advertise indiranagar ka gunda behind the scenes video viral)

या व्हायरल झालेल्या जाहीरातीत द्रविड अगदी संतापलेला दिसतो. द्रविड या व्हिडीओमध्ये लोकांच्या रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करताना दिसतो. तसेच त्यानंतर द्रविड गाडीत उभा राहत मी इंदिरानगरचा गुंडा आहे, असं जोरजोरात ओरडू लागतो. या व्हिडीओनंतर ट्विटरवर #IndiraNagarKaGunda हा हॅश्टॅग ट्रेंड झाला होता.

जाहीरातीदरम्यान व्हिडीओ व्हायरल

क्रेडने या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शूटिंग करताना द्रविडला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. शांत आणि संयमी स्वभावाच्या द्रविडला संताप व्यक्त करणं आव्हानात्मक होतं. द्रविडला शूटिंगवेळेस हसू येत होतं. द्रविडला संतापलेली भूमिका करण्यासाठी द्रविडला अनेक रिटेक घ्यावे लागले. द्रविडला गाडीचा मिरोर फोडताना हसू येत होतं.

द्रविडकडून गाडीची तोडफोड

द्रविड या व्हीडीओमध्ये बॅटने चारचाकीचा मिरोर फोडताना दिसतो. ही चारचाकी ज्यांच्या मालकीची आहे त्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. या गाडीत तरुण तरुणी बसलेले होते. “द्रविडने आमच्या गाडीची तोडफोड केली यामुळे मला चांगलं वाटलं”, अशी प्रतिक्रिया त्या तरुणीने दिली.

विराट कोहलीकडून व्हीडीओ शेअर

द्रविडच्या या जाहीरातीचा व्हीडीओ टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने ट्विट केला होता. राहुल दादाचे हे रुप तुम्ही पाहिलं नसेल, अशी कॅप्शन देत विराटने हा व्हिडीओ शेअर केला होता.

राहुल द्रविडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

द्रविडने 164 टेस्ट, 344 वनडे आणि 1 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. द्रविडने एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारात 10 हजारांपेक्षा अधिक धावा करण्याची कामगिरी केली आगे. द्रविडने 286 कसोटी डावांमध्ये एकूण 13 हजार 288 धावा केल्या आहेत. तसेच वनडेमध्ये त्याने 39.16 च्या सरासरीने 10 हजार 889 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ

(team india former captain rahul dravid cred advertise indiranagar ka gunda behind the scenes video viral)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.