AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : कधी जिंकू-कधी हारु…, भारताच्या विजयानंतर हेड कोच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir On Team India Win IN 5th Test Against England : गौतम गंभीर हेड कोच झाल्यापासून भारतीय कसोटी संघाला मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत पराभूत व्हावं लागलं. भारताला गंभीरच्या मार्गदर्शनात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अपवाद वगळात काही खास करता आलं नव्हतं. मात्र आता भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत राखल्याने गंभीरला दिलासा मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

ENG vs IND :  कधी जिंकू-कधी हारु..., भारताच्या विजयानंतर हेड कोच गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया
Team India Head CoachImage Credit source: Getty Images
| Updated on: Aug 04, 2025 | 11:29 PM
Share

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने सोमवारी 4 ऑगस्टला गस एटकीन्सन याला बोल्ड करताच साऱ्या स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. क्रिकेट चाहत्यांनी एकच जल्लोष केला. भारतीय खेळाडूंनी एकमेकांना मीठी मारली. क्रिकेट चाहत्यांनी जागेवर राहत भारतीय संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं. ड्रेसिंग रुममध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर कायम गंभीर मुद्रेत असतात. मात्र गंभीरही हसू लागले. भारताने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर मात करत मालिका बरोबरीत सोडवल्याने हा सर्व आनंद पाहायला मिळाला. टीम इंडिया या सामन्यात पछाडली होती. मात्र भारताने जोरदार कमबॅक केलं आणि विजय साकारला.

या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावरुन आजी माजी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांनी भारताचं अभिनंदन केलं. तसेच गंभीरने या विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली. गंभीरने दिलेल्या प्रतिक्रियेत या साऱ्या मालिकेचा सार आहे. गंभीरने एक्स पोस्टद्वारे नक्की काय प्रतिक्रिया दिली? हे जाणून घेऊयात.

भारताने इंग्लंडचा थरारक झालेल्या पाचव्या सामन्यात इंग्लंडचा 6 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांची मालिका यशस्वीरित्या 2-2 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. टीम इंडियाचा हा पाचव्या सामन्यातील विजय हेड कोच गंभीरसाठी फार महत्त्वाचा ठरला. गंभीरच्या मार्गदर्शनात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा अपवाद वगळता भारताला काही खास करता आलं नाही. त्यामुळे गंभीर निशाण्यावर होता. मात्र ही मालिका बरोबरीत सोडवल्याने गंभीरला दिलासा मिळाला असेल, म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

टीम इंडियाने या मालिकेत अनेक अडचणींवर मात करत इंग्लंडला जशास तसं उत्तर दिलं. त्यामुळे इंग्लंडला मालिका जिंकता आली नाही. कर्णधार शुबमन गिल याची ही पहिलीच मालिका होती. मात्र टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने इंग्लंड दौऱ्याचं आव्हान सार्थपणे पेललं आणि इंग्लंडला बरोबरीत रोखलं. या विजयानंतर गंभीरने पोस्टमध्ये काय काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

गंभीरची एक्स पोस्ट

गंभीरने पोस्टमध्ये काय म्हटलं?

आम्ही कधी जिंकू, कधी हारु, मात्र आम्ही कधीही आत्मसमर्पण करणार नाही. शाब्बास पोरांनो”, अशा शब्दात गंभीरने भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.