AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : इंग्लंड दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया आता एक्शन मोडमध्ये केव्हा? जाणून घ्या

Indian Cricket Team : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप 2025-2027 या साखळीतील आपली पहिली मालिका जिंकता आली नाही. मात्र भारताने ही मालिका इंग्लंडलाही जिंकून दिली नाही. भारताने इंग्लंड दौऱ्याची सांगता विजयाने केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा पुढील आंतरराष्ट्रीय सामना केव्हा होणार? जाणून घ्या.

ENG vs IND : इंग्लंड दौऱ्याची यशस्वी सांगता, टीम इंडिया आता एक्शन मोडमध्ये केव्हा? जाणून घ्या
Team India 5th TestImage Credit source: PTI
| Updated on: Aug 05, 2025 | 12:04 AM
Share

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने इंग्लंड दौऱ्याची विजयी सांगता केली. टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या विजयाचं सेलीब्रेशन करणार आहे. टीम इंडिया आता पुढील काही आठवडे रिलॅक्स मोडवर असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस क्रिकेट चाहत्यांना सामन्याशिवाय काढावे लागणार आहेत. त्यामुळे आता भारतीय संघ पुन्हा केव्हा एक्शन मोडमध्ये दिसणार? हे जाणून घेऊयात.

क्रिकेट चाहत्यांना आता टीम इंडियाला मैदानात पाहण्यासाठी 1 महिन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. भारतीय संघाचा ऑगस्ट महिन्यात एकही सामना नियोजित नाही.

टीम इंडियाचं मैदानात कमबॅक केव्हा?

भारतीय संघ इंग्लंडनंतर बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. मात्र बीसीसीआयने बांगलादेश दौरा वर्षभरासाठी स्थगित केला. तसेच टीम इंडिया श्रीलंका दौरा करेल, अशी चर्चा होती. मात्र या दौऱ्याबाबत काहीही होऊ शकलं नाही. त्यामुळे आता टीम इंडिया थेट सप्टेंबर महिन्यात एक्शन मोडमध्ये असेल हे निश्चित आहे.

टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर टी 20I सामने खेळणार आहे. आशिया कप स्पर्धचा थरार 9 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आलं आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर टीम इंडिया दुसर्‍या सामन्यात 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. भारताचा या स्पर्धेतील साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 19 सप्टेंबरला होईल. या सामन्यात ओमानसमोर भारताचं आव्हान असणार आहे. त्यानंतर सुपर 4 फेरीचा थरार रंगणार आहे. सुपर 4 मध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मात्र वाढत्या विरोधानंतर भारत-पाकिस्तान सामना होणार की नाही? हे येत्या काही दिवसातंच स्पष्ट होईल.

8 संघ आणि 2 गट

दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. तर बी ग्रुपमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.