AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy 2025 : टीम इंडियाच्या ओपनरला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुख्य संघातून डच्चू, या खेळाडूला संधी

Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी 11 फेब्रुवारीला 2 बदल करण्यात आले. त्यानुसार, निवड समितीने टीम इंडियाच्या ओपनरला मुख्य संघातून डच्चू दिला आहे.

Champions Trophy 2025 : टीम इंडियाच्या ओपनरला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुख्य संघातून डच्चू, या खेळाडूला संधी
shubman gill and yashasvi jaiswal
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Feb 12, 2025 | 9:33 AM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीआधी बीसीसीआय निवड समितीने टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ अखेर निश्चित केला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला झालेल्या दुखापतीमुळे तो खेळणार की नाही? याबाबत अनिश्चितता होती. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीची दुखापत झाली होती. मात्र त्यानंतरही बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीआधी फिट होईल, असा आशावाद बाळगून निवड समितीने बुमराहचा समावेश केला होता. मात्र बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खेळणार नसल्याचं बीसीसीआयने 11 फेब्रुवारीला जाहीर केलं. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका लागला. बुमराहच्या जागी संघात नवख्या हर्षित राणा याचा समावेश केला आहे. तसेच निवड समितीने घेतलेला दुसरा निर्णय हा अनपेक्षित होता.

निवड समितीने यशस्वी जयस्वाल याला मुख्य संघातून वगळलं आहे. यशस्वीचा मुख्य संघातून ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. यशस्वीच्या जागी चक्क स्पिनर वरुण चक्रवर्ती याचा समावेश करण्यात आला आहे. यशस्वीचा संघात पर्यायी सलामीवीर म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र अखेरच्या क्षणी वरुण चक्रवर्ती याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संधी देण्यात आली आहे. वरुणचा अशाच प्रकारे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला.

वरुणची टी 20i मालिकेतील कामगिरी

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची 5 सामन्यांची टी 20i मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. वरुणने मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने 5 सामन्यांमध्ये एकूण 14 विकेट्स घेतल्या. वरुणची या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ म्हणून निवड करण्यात आली. वरुणला या कामगिरीच्या जोरावर अखेरच्या क्षणी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात संधी देण्यात आली. वरुणने कटकमध्ये झालेल्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केलं.

यशस्वीला डच्चू, वरुणला संधी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...