AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA | पहिल्या कसोटीमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री, ताकद दुपटीने वाढणार

Mohammed Shami Replace Player : पहिल्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाचा झालेल्या पराभवाने क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमधील पराभवानंतर हा दुसरा मोठा पराभव आहे. टीम इंडियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम मॅनेजमेंटने स्टार खेळाडूची निवड केली आहे.

IND vs SA | पहिल्या कसोटीमधील पराभवानंतर टीम इंडियामध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री, ताकद दुपटीने वाढणार
avesh khan replace mohammed shami for second test
| Updated on: Dec 29, 2023 | 2:46 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला. एक डाव  आणि 32 धावांनी साऊथ आफ्रिका संघाने विजय मिळवत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाची गोलंदाजी आणि फलंदाजी सपशेल अपयशी ठरलेली दिसली. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे नाहीतर टीम इंडियावर 2-0 ने मालिका गमावण्याची नामुष्की येऊ शकते. अशातच टीम इंडियामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी एका स्टार खेळाडूचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कोण आहे तो मॅचविनर खेळाडू

या मॅचविनर खेळाडूच्या येण्याची संघाची ताकद वाढली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आवेश खान आहे. आताच पार पडलेल्या वन डे मालिकेमध्येही तो खेळला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमी याच्या जागी बदला खेळाडू म्हणून त्याची संघात निवड केली आहे. याबाबत बीसीसीआयने एक्स (ट्विट) करत माहिती दिली आहे.

वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात आवेश खानने मॅच विनरची भूमिका बजावली होती. त्याने 27 धावांत चार विकेट घेतल्यामुळे यजमान संघ 27.3 षटकांत 116 धावांवर ऑल आऊट झाला होता.

कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध्द कृष्णा, केएस भरत (WK), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.