IND vs SL: भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना, टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी

हरमनप्रीत कौर तिच्या कर्णधार या पदाचा आनंद घेत आहे. धावा करण्याव्यतिरिक्त ती तिच्या सुधारित ऑफ-स्पिनसह विकेट्स देखील घेत आहे. पहिल्या वनडेत कमी धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीची फळी कोसळली. हरमनप्रीत, हरलीन देओल, दीप्ती, पूजा यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीने भारताला सलामीच्या सामन्यात विजय मिळवून दिला.

IND vs SL: भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामना, टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी
भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज श्रीलंकेविरुद्ध दुसरा सामनाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:41 AM

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ (Indian Womens Team) आज (सोमवारी) दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) विजय मिळवून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. महिला संघाच्या (Womens Team) आघाडीच्या आणि तरबेज खेळाडूंच्या फळीकडून विशेषतः सलामीवीरांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. टी-20 (T-20) मालिका 2-1 नं जिंकल्यानंतर भारताने कमी धावसंख्येचा पहिला सामना 72 चेंडूत चार विकेट राखून जिंकून वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. हा सहज विजय असूनही उपकर्णधार स्मृती मानधना आणि तरुण शेफाली वर्मा या सलामीच्या जोडीबद्दल काही चिंता नक्कीच होती. दरम्यान, आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार असून आघाडीच्या सामना जिंकण्यावर आणि भारताला यश मिळवून देण्याकडे संघाचं लक्ष असणार आहे. आज हे खेळाडू कशी कामगिरी करता त्याकडे भारतीयांचं आणि विशेष म्हणजे क्रिकेट प्रेमी यांचं लक्ष असणार आहे.

स्मृती-शेफाली या दोन फलंदाजांना आतापर्यंत या दौऱ्यात कोणतीही मजबूत भागीदारी करता आली नाही.  यामुळे संघाला वेगवान सुरुवात करता आली नाही. या दौऱ्यात फक्त दोन सामने शिल्लक असल्यानं मंधाना आणि वर्मा यांना आता मोठी धावसंख्या करायची आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या भूमिकेचा आनंद घेत आहे. धावा करण्याव्यतिरिक्त ती तिच्या सुधारित ऑफ-स्पिनसह विकेट्स देखील घेत आहे. पहिल्या वनडेत कमी धावसंख्येचा पाठलाग करताना आघाडीची फळी कोसळली. हरमनप्रीत, हरलीन देओल, दीप्ती, पूजा यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीने भारताला सलामीच्या सामन्यात विजय मिळवून दिला.

फिरकीपटूंनी दाखवली ताकद

भारतीय गोलंदाज विशेषत: फिरकीपटू श्रीलंकेच्या संथ खेळपट्ट्यांचा चांगला उपयोग करत आहेत आणि या दौऱ्यात संघाच्या विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उजव्या हाताची मध्यमगती गोलंदाज रेणुका सिंगनं 29 धावांत तीन बळी घेतले. तथापि, दीप्ती शर्माच्या (3/25) ऑफ ब्रेकने श्रीलंकेचा कणा मोडला कारण पाहुण्यांना पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 171 धावा करता आल्या.

हे सुद्धा वाचा

यजमानांकडून दुसरी मालिका गमावण्याच्या धोक्यात

कर्णधार अटापट्टू आपल्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल, अशी आशा श्रीलंका संघाला असेल. हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी चांगली फलंदाजी केली पण त्यांना भागीदारीची गरज आहे. डावखुरा फिरकीपटू इनोका रणवीराने गोलंदाजीत चमक दाखवली पण तिला तिच्या सहकाऱ्यांची मदत लागेल. श्रीलंकेचा संघ गेल्या महिन्यात पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावला होता आणि या फॉरमॅटमध्ये सलग दुसऱ्या मालिकेतील राभव टाळू शक इच्छितो.

सामना: सकाळी 10 वा.

संघ पुढीलप्रमाणे:

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया (डब्ल्यूके), एस मेघना, दीप्ती शर्मा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, सिमरन बहादूर, रिचा घोष (डब्ल्यूके), पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका सिंग, तानिया भाटिया (wk), हरलीन देओल.

श्रीलंका : अटापट्टू (कर्णधार), निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, विश्मी गुणरत्ने, अमा कांचना, हंसिमा करुणारत्ने, अचीनी कुलसूरिया, सुगंधाइका कुमारी, हर्षिता समरविक्रमा, हसिनी परेरा, उदेशिका प्रबोधनी, ओशादी रणशिव रणसिंघे, सतिशो रणसिंघे, उदेशिका प्रबोधनी, सनदीव रणसिंघे. अनुष्का मलशा शेहानी आणि थारिका सेवंडी.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.