ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी होणार फैसला, खेळाडूंची धाकधूक वाढली

आयपीएल 2025 स्पर्धेच्या मेगा लिलावासाठी बिगुल वाजलं आहे. मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबरला पार पडणार आहे. सौदी अरेबियाच्या जेदाहमध्ये ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण 1574 जणांचा फैसला होणार आहे. भारताचे 48 कॅप्ड प्लेयर्स मैदानात असतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी होणार फैसला, खेळाडूंची धाकधूक वाढली
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 10:04 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी तयारी सुरु झाली आहे. नुकतीच आयपीएल फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. आता उर्वरित 204 जागांसाठी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. भारताचे 48 कॅप्ड प्लेयर या लिलावात असणार आहे. त्यांच्यासाठी 10 फ्रेंचायझी बोली लावतील.बीसीसीआयने मेगा लिलावासाठी तारीख निश्चित केली आहे. मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेदाहमध्ये नोव्हेंबर 24 आणि 25 ला पार पडणार आहे. दोन दिवसाच्या लिलाव प्रक्रियेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना असणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या दिवशीचा खेळ सुरु असताना ही लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. लिलाव प्रक्रियेत 1574 खेळाडूंनी भाग घेतला आहे. यात 1165 भारतीय आणि 409 विदेशी खेळाडू आहेत. 204 जागांसाठी या खेळाडूंमधून निवड होणार आहे. त्यामुळे कोणाला भाव मिळतो आणि कोणाला नाही याची उत्सुकता लागून आहे. 48 कॅप्ड प्लेयरमध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी बोली लागणार आहे.

भारताबाहेर लिलाव प्रक्रिया पार पडण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी  आयपीएल 2024 मध्ये दुबईत मिनी लिलाव पार पडला होता. खेळाडूंनी या लिलावासाठी 4 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी केली आहे. बीसीसीआयच्या अहवालानुसार, 320 कॅप्ड आणि 1224 अनकॅप्ड प्लेयर आहेत. 30 प्लेयर हे असोसिएट नेशन असणार आहेत. कॅप्ड भारतीय (48 खेळाडू), कॅप्ड आंतरराष्ट्रीय (272 खेळाडू), अनकॅप्ड भारतीय जे मागील आयपीएल हंगामाचा भाग होते (152 खेळाडू), अनकॅप्ड इंटरनॅशनल खेळाडू जे मागील आयपीएल हंगामाचा भाग होते (3 खेळाडू), अनकॅप्ड भारतीय (965 खेळाडू), अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय (104 खेळाडू) अशी नोंदणी झाली आहे.

अफगाणिस्तानकडून 29, ऑस्ट्रेलियाकडून 76, बांगलादेशकडून 13, कॅनडातून 4, इंग्लंडमधून 52, आयर्लंडमधून 9, इटलीमदून 1, नेदरलँडमधून 12, न्यूझीलंडमधून 39, स्कॉटलँडमधून 2, दक्षिण अफ्रिकेतून 91, श्रीलंकेतून 29, युएईतून 1, युएसएतून 10, वेस्ट इंडिजमधून 33 आणि झिम्बाब्वेतून 8 खेळाडूंचा समावेश आहे.

बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट
बीडमध्ये हिंसक वातावरण, जाळपोळ अन् मस्साजोग गावाला जरांगे पाटलांची भेट.
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
'मी राजीनामा देण्यास तयार', मारकडवाडीतून नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य.
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ
भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत शिवीगाळ.
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले...
लातूर शेतकरी जमीन प्रकरणात वक्फ बोर्डाकडून मोठा खुलासा, म्हणाले....
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर की मशीद? कोर्टानं काय दिला निर्णय.
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख
'100 शकुनी मेल्यावर...', गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख.
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ
सदाभाऊंनी मारकडवाडी गाजवली, शरद पवार-गांधींची मिमिक्री अन् हस्यकल्लोळ.
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा
'वर्षभराच्या आत....', राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना थेट इशारा.
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ
महिला सरपंचाच्या पतीचा खून की..? मृतदेह आढळल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ.
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात..
कुर्ला बस अपघातप्रकरणी फडणवीसांकडून 5 लाखांची मदत; म्हणाले, दुःखात...