AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs MI : हा फक्त झटका होता.., हार्दिकचा पराभवानंतर खेळाडूंना थेट मेसेज

Hardik Pandya PBKS vs MI IPL 2025 : मुंबई इंडियन्स निर्णायक सामन्यात अपयशी ठरली. पंजाबने किंग्सने मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या याने अनेक गोष्टींवर भाष्य केलं. हार्दिकने या दरम्यान मुंबईच्या खेळाडूंना संदेश दिला.

PBKS vs MI : हा फक्त झटका होता.., हार्दिकचा पराभवानंतर खेळाडूंना थेट मेसेज
Suryakumar Yadav PBKS vs MI IPL 2025Image Credit source: Social Media
| Updated on: May 27, 2025 | 1:19 AM
Share

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी ठरली. मुंबईने फक्त सामनाच गमावला नाही तर अंतिम फेरीत 2 वेळा पोहचण्याची संधीही गमावली. पंजाब किंग्सने जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात मुंबईवर एकतर्फी विजय मिळवला आणि क्वालिफायर 1 चं तिकीट मिळवलं. मुंबईने विजयासाठी दिलेलं 185 धावांचं आव्हान पंजाबने 9 बॉल राखून 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबईच्या या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या नाराज झालेला दिसला. हार्दिकने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. तेव्हा हार्दिकच्या तोंडी सूर्यकुमारचेच बोल होते. हार्दिक तेच म्हणाला जे सूर्यकुमार यादव पहिल्या डावानंतर म्हणाला. सूर्या काय म्हणाला होता? तसेच हार्दिकने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्ससाठी सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 57 रन्स केल्या. तर इतरांनीही योगदान दिलं. त्यामुळे मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 रन्स केल्या. मात्र मुंबई 200 पार पोहचण्यात अपयशी ठरली. पहिल्या डावानंतर सूर्याने दिलेल्या मुलाखतीत आम्ही आणखी 10-20 धावा करण्यात कमी पडलो, असं म्हटलं. हेच हार्दिकनेही पराभवानंतर सांगितलं. हार्दिकने काय म्हटलं? हे सविस्तर जाणून घ्या.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

“खेळपट्टी ज्या पद्धतीने खेळ दाखवत होती. त्यानुसार निश्चितच आम्ही 20 धावा कमी केल्या. असं होतं. आम्ही वास्तवात चांगलं क्रिकेट खेळत होतो. आम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकलो नाहीत. त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. आयपीएल असंच आहे. या फ्रँचायजीने (मुंबई इंडियन्स) 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे, हे नेहमीच अवघड राहिलं आहे. जेव्हा तुम्ही वेग कमी करता तेव्हा इतर संघ जिंकण्यासाठी सज्ज असतात”, असं हार्दिकने म्हटलं. तसेच हार्दिकने एलिमिनेटरबाबतही प्रतिक्रिया दिली आणि खेळाडूंना स्पष्ट संदेश दिला.

मुंबई या पराभवामुळे प्लेऑफमध्ये सर्वात शेवटी अर्थात चौथ्या स्थानी असणार आहे. त्यामुळे आता मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी एलिमिनेटनंतर क्वालिफायर-1 मध्ये पराभूत होणाऱ्या संघाविरुद्ध जिंकावं लागणार आहे. मुंबई एलिमिनेटर सामना हा 30 मे रोजी खेळणार आहे. एलिमिनेटर सामन्याआधी कॅप्टन हार्दिकने सहकाऱ्यांना संदेश दिला आहे. “स्पष्ट संदेश आहे, हा फक्त एक झटका होता. यातून धडा घ्या, नॉकआऊटसाठी तयार रहा”, असं हार्दिकने म्हटलं.

पंजाबची बॅटिंग

दरम्यान पंजाबकडून विजयी आव्हान हे 5 खेळाडूंनीच पूर्ण केलं आणि मुंबईवर दणदणीत विजय मिळवला. पंजाबसाठी जोश इंग्लिस याने सर्वात जास्त 73 रन्स केल्या. प्रियांश आर्या याने 62 धावा केल्या. प्रभसिमरन सिंह याने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद 26 रन्स केल्या. तर नेहल वढेरा 2 धावा करुन नाबाद परतला.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.