AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA vs PAK : अमेरिकेच्या टीममध्ये गुजरातचा धोनी, त्यानेच T20 WC मध्ये पाकिस्तान विरुद्ध लिहिली विजयाची स्क्रिप्ट

USA vs PAK : अमेरिकेने T20 वर्ल्ड कपच्या एका रोमांचक सामन्यात पाकिस्तानला हरवलं. या मॅचमध्ये अमेरिकेच्या विजयात काही भारतीय वंशाचे प्लेयर्स हिरो ठरले. या टीममध्ये एक असा खेळाडू होता, ज्याने एमएस धोनीसारखा खेळ कंट्रोल केला व अमेरिकेच्या विजयाची स्क्रिप्ट लिहिली.

USA vs PAK : अमेरिकेच्या टीममध्ये गुजरातचा धोनी, त्यानेच  T20 WC मध्ये पाकिस्तान विरुद्ध लिहिली विजयाची स्क्रिप्ट
usa captain monank patelImage Credit source: PTI
| Updated on: Jun 07, 2024 | 9:55 AM
Share

अमेरिकेच्या डलासमध्ये 6 जूनला पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामना झाला. T20 वर्ल्ड कपमधील ही 11 वी मॅच होती. या मॅचचा जो निकाल लागला, त्याची कोणी कल्पनाच केली नव्हती. अमेरिकेसारख्या नवख्या टीमने बलाढ्य पाकिस्तानला पराभवाच पाणी पाजलं. वनडे आणि T20 हे दोन्ही वर्ल्ड कप पाकिस्तानने जिंकले आहेत. अशा टीमला अमेरिकेने पराभूत केलं. त्यामुळे या पराभवाची सर्वाधिक चर्चा होणं, स्वाभाविक आहे. दोन्ही टीम्समध्ये 40 ओव्हरची मॅच झाली. पण निकाल लागू शकला नाही. म्हणून 41 वी म्हणजे सुपर ओव्हर झाली. त्यातून सामन्याचा जो निकाल लागला, त्याने सगळ्यांनाच धक्का बसला. एक मोठा उलटफेर झाला. त्यात अमेरिकेचा कॅप्टन मोनंक पटेलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून त्याची निवड झाली. या मॅचमध्ये मोनंक पटेल अमेरिकेसाठी एमएस धोनी बनला.

अमेरिकेची टीम पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपमध्ये खेळतेय. पहिल्यांदाच या टीमने पाकिस्तान सारख्या बलाढ्य संघाला पराभवाच पाणी पाजलं. या विजयात संपूर्ण टीमने शानदार प्रदर्शन केलं. यात टीमचा विकेटकीपर कॅप्टन मोनंक पटेलचा रोल महत्त्वाचा होता. टुर्नामेंट सुरु होण्याआधीच त्याने आपल्या टीमचा विश्वास जिंकला होता. अन्य टीम्सना वॉर्निंग दिली होती. आता मोनंकने स्वत:ला सिद्ध केलय. संपूर्ण सामन्यात एक क्षणही असं वाटलं नाही की, असोसिएट नेशन पहिल्यांदा वर्ल्ड कप खेळत आहे.

मोनंक पटेलने धोनीसारख काय केलं?

मोनंक पटेलने धोनीसारखी परफेक्ट प्लानिंग करुन मैदानावर त्याची अमलबजावणी केली. त्याबद्दल तो मॅचनंतर बोलला. सुरुवातीला त्याने गोलंदाजांचा खुबीने वापर केला व पाकिस्तानवर दबाव आणला. मधल्या ओव्हर्समध्ये बदल केले. त्याच्या नेतृत्वाखाली टीमने शानदार फिल्डिंग केली. पाकिस्तानला 159 धावांवर रोखण्यात ते यशस्वी ठरले.

अमेरिकेने मॅच जिंकून नवीन इतिहास रचला

अमेरिकेची टीम जेव्हा पाकिस्तानच्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, त्यावेळी मोनंक पटेलने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. शानदार अर्धशतक त्याने झळकावलं. 36 धावसंख्येवर पहिला विकेट गेल्यानंतर त्याने स्वत:ला शांत ठेवलं. पाकिस्तानच्या दमदार गोलंदाजीसमोर इनिंग सावरली. त्याने एक मोठी भागीदारी केली. त्यामुळे अमेरिकेची टीम शेवटपर्यंत मॅचमध्ये टिकून राहिली व मॅच टाय झाली. सुपरओव्हरमध्ये एक क्षण गोलंदाज सौरभ नेत्रवाळकर थोडा टेन्शनमध्ये दिसला. त्यावेळी मोनंक त्याच्याजवळ जाऊन त्याच्याशी बोलला. त्याला योग्य सल्ला दिला. अखेरीस अमेरिकेने मॅच जिंकून नवीन इतिहास रचला. मोनंकने 38 चेंडूत 50 धावा केल्या.

गुजरातच्या मोनंकला अमेरिकेच ग्रीन कार्ड कधी मिळालं?

मोनंक पटेल 31 वर्षांचा आहे. अमेरिकेकडून खेळणाऱ्या मोनंकचा जन्म गुजरातमध्ये झालाय. फलंदाजीसह अमेरिकेसाठी तो विकेटकीपिंग आणि कॅप्टनशिप करतो. मोनंक राज्य स्तरावर गुजरातसाठी अंडर 16 आणि अंडर 19 मध्ये खेळलाय. 2010 मध्येच त्याला अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळालय. पण 2016 मध्ये तो अमेरिकेत शिफ्ट झाला. 2018 साली अमेरिकेच्या टीममध्ये त्याची निवड झाली.

मोनंकची वनडेमध्ये कामगिरी कशी आहे?

अमेरिकेला विजय मिळवून देण्याची त्याची ही पहिली वेळ नाहीय. 2018 सालच्या आयसीसी वर्ल्ड टी20 क्वालिफायरमध्ये अमेरिकेकडून त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. 6 सामन्यात त्याने 208 धावा केल्या होत्या. मोनंक आतापर्यंत 27 T20 सामने खेळलाय. यात 129 च्या स्ट्राइक रेटने 507 धावा केल्या आहेत. 47 वनडे सामन्यात 1446 धावा केल्या आहेत.

...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.