AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: चलो, समस्तीपूर, वैभव सूर्यवंशीने दामटली कार? सोशल मीडियावर Viral Video पाहिला का?

Vaibhav Suryavanshi Drive Car Without License: आयपीएलला पडलेले स्वप्न, वंडर बॉय, राजस्थान रॉयल्सचा एक खांबी तंबू वैभव सूर्यवंशी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो खरंच इतक्या कमी वयात कार चालवतोय का?

Vaibhav Suryavanshi: चलो, समस्तीपूर, वैभव सूर्यवंशीने दामटली कार? सोशल मीडियावर Viral Video पाहिला का?
वैभव सूर्यवंशीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 12, 2026 | 11:44 AM
Share

Vaibhav Suryavanshi Drive Car Without Lisence: आयपीएल 2026 मध्ये वंडर बॉय आणि राजस्थान रॉयल्स संघाचा एक खांबी तंबू वैभव सूर्यवंशी याचाच डंका सुरू आहे. त्याच्या दमदार खेळीने दिग्गज खेळाडू आणि गोलंदाज प्रभावित झाले आहे. त्याला भारताच्या मुख्य संघात स्थान देण्याची मागणी सुरू आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात तो विना परवाना एक कार दामटत असल्याचा दावा करण्यात येत आहे. काय आहे या व्हिडिओची सत्यता? तुम्हाला सुद्धा आश्चर्चय वाटणार, तुम्ही हसू कसं आवरणार?

या व्हायरल व्हिडिओचं सत्य तरी काय?

Rajasthan Royals संघानेच हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत वैभव सूर्यवंशी एक कार चालवत असल्याचे दिसते. पण ती काही खरी खुरी कार नाही तर एक रिमोटद्वारे कंट्रोल कार आहे. ही कार छोटी सिएरा आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान ही कार नाणेफेक करताना अम्पायर जवळ येते. वैभव सूर्यवंशी हा कमी वयाचा आहे. तो अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे वाहन परवाना असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठी चारचाकी चालवणे हा गुन्हा आहे. पण वैभव एक रिमोट कंट्रोल कार चालवत असल्याने त्याच्यावर कुणाचाच आक्षेप नाही. उलट यावेळी राजस्थान रॉयल्सचे खेळाडू हास्यविनोद करताना दिसून येत आहेत.

अरे, याच्याकडे तर लायसन्स नाही

व्हिडिओत वैभव सूर्यवंशी रिमोटच्या मदतीने हा मन लावून ही कार मागे नेत, पुढे नेत असल्याचे दिसते. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सच्या स्टाफने त्याची चांगलीच फिरकी घेतली. वैभवला तर मोठी कार चालवायची आहे, पण अरे याच्याकडे तर लायसन्स नाही असा चिमटा कर्मचारी काढताना दिसत आहेत.

चलो समस्तीपूर, चला जाऊयात

त्याचवेळी चलो समस्तीपरू, चला रे सगळे कारने जाऊयात असा एक सहकारी पाठीमागून आवाज देताना दिसतो. वैभव सूर्यवंशी हा बिहार राज्यातील समस्तीपूर येथील रहिवाशी आहे. त्यावरून हे खेळाडू आता ही रिमोटची कार घेऊन वैभव समस्तीपूरला जाणार असल्याची कोपरखळी मारताना दिसले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.