AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : टी 20I आशिया कप स्पर्धेत शतक करणारे 2 फलंदाज, तो एकमेव भारतीय कोण?

Century in Asia Cup T20 Format : टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2023 आशिया कप ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेतील सामने हे 50 षटकांचे होते. मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे.

Asia Cup : टी 20I आशिया कप स्पर्धेत शतक करणारे 2 फलंदाज, तो एकमेव भारतीय कोण?
Asia Cup TrophyImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Aug 18, 2025 | 9:49 PM
Share

आशिया खंडातील वर्ल्ड कप स्पर्धा अर्थात आशिया कप 2025 स्पर्धेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप टी 20 फॉर्मेटने होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. तसेच या 8 संघांची 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेतील सामने होणार असल्याने चाहत्यांना फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. टी 20 फॉर्मेटने झालेल्या आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत फक्त 2 फलंदाजांनाच शतक करता आलं आहे. या 2 फलंदाजांमध्ये 1 भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. ते 2 फलंदाज कोण आहेत? तसेच त्यांनी कोणत्या संघााविरुद्ध तिहेरी आकडा गाठला होता? हे सविस्तर जाणून घेऊयात.

टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात विराट कोहली आणि बाबर हयात या दोघांनी शतक केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही प्रत्येकी 122 धावाच केल्या आहेत. विराटने ही 2022 मध्ये शतक केलं होतं. तर बाबर हयात याने 2016 मध्ये शेकडा ठोकला होता.

विराट कोहली

विराटने 8 सप्टेंबर 2022 रोजी अफगाणिस्तान विरुद्ध ही स्फोटक खेळी केली होती. विराट या सामन्यात केएल राहुल याच्यासह ओपनिंगला आला होता. या दोघांनी 12.4 ओव्हरमध्ये 119 धावांची सलामी भागीदारी केली होती

केएल राहुल याने 41 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या होत्या. तर विराट कोहली याने या 122 धावांची नाबाद स्फोटक खेळी केली होती. विराट 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. या जोडीन केलेल्या वादळी खेळीमुळे भारताने 2 विकेट्स गमावून 212 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी भारताच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 111 धावाच करता आल्या. भारताने अशाप्रकारे हा सामना 101 धावांनी जिंकला.

बाबर हयात

हाँगकाँगच्या बाबर हयात याने 19 फेब्रुवारी 2016 रोजी ओमान विरुद्ध शतक ठोकलं होत. ओमानने 5 विकेट्स गमावून 180 धावा केल्या होत्या. ओमानसाठी जतिंदर सिंह याने 42 तर आमिर अली याने 32 धावा केल्या.

हाँगकाँगला प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 175 धावाच करता आल्या. हाँगकाँगला हा सामना जिंकता आला नाही. मात्र बाबरने आपली छाप सोडली. बाबरने 60 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 122 धावांची तुफानी खेळी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...