AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND: थँक्यू ऑस्ट्रेलिया, रोहित-विराटची दणदणीत विजयानंतर निवृत्तीबाबत प्रतिक्रिया काय?

Virat Kohli and Rohit Sharma On Odi Retirement : हिटमॅन रोहित शर्मा याने सिडनीत खणखणीत शतक झळकावत भारताला विजयी केलं. तसेच विराट कोहली याने रोहितला चांगली साथ दिली आणि अर्धशतक ठोकलं. रोहित आणि विराटने या विजयानंतर निवृत्तीबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

AUS vs IND: थँक्यू ऑस्ट्रेलिया, रोहित-विराटची दणदणीत विजयानंतर निवृत्तीबाबत प्रतिक्रिया काय?
Rohit Sharma and Virat Kohli On Odi RetirementImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 25, 2025 | 5:40 PM
Share

टीम इंडियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात दणदणीत असा विजय साकारला. भारताने विजयासाठी मिळालेलं 237 धावांचं आव्हान हे 38.3 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. भारताने हा सामना 9 विकेट्सने आपल्या नावावर केला. भारताने यासह 3-0 अशा फरकाने पराभव टाळला. भारताला 69 बॉलआधी विजय मिळवून देण्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने प्रमुख भूमिका बजावली. विराट आणि रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटच्या टप्प्यात आहे. या दोघांचा ऑस्ट्रेलियातील हा शेवटचा सामना समजून चाहत्यांनी मोठी गर्दी केली. रोहित आणि विरटनेही चाहत्यांनी निराशा नाही. दोघांनीही पैसावसूल खेळी करत साऱ्या क्रिकेट विश्वाची मनं जिकंली. तसेच दोघांनी सामन्यानंतर निवृत्तीबाबत भाष्य केलं.

रोहितने भारताच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं. रोहितने 125 बॉलमध्ये नॉट आऊट 121 रन्स केल्या. तर विराटनेही दम दाखवला. विराटने 81 बॉलमध्ये 74 रन्स केल्या. रोहित-विराटने दुसर्‍या विकेटसाठी 168 धावांची नाबाद विजयी भागीदारी साकारली. दोघेही भारताला विजयी करुन परतले. भारताच्या विजयानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. रोहित आणि विराटने सामन्यानंतर निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आणि एकदाचाच विषय संपवला.

विराट-रोहितची निवृत्तीवर प्रतिक्रिया काय?

सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी विकेटकीपर फलंदाज एडम गिलक्रिस्ट याने विराट-रोहितसोबत संवाद साधला. या दरम्यान विराट-रोहितने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नसल्याचं स्पष्ट केलं. “मला माहित नाही की मी पुन्हा ऑस्ट्रेलियाला खेळायला येईन की नाही. मात्र मला इथे खेळायला फार मजा येते”, असं विराटने म्हटलं.

चाहत्यांचे जाहीर आभार

रोहित-विराट यांना पाहण्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये मोठ्या संख्येने चाहते आले होते. भारताच्या अनुभवी जोडीने ऑस्ट्रेलियातील चाहत्यांचेही आभार मानले. रोहित-विराटने ऑस्ट्रेलियातील क्रिकेट चाहत्यांचे त्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आभार मानले. तसेच दोघांनी निवृत्तीच्या चर्चेवर पूर्णविराम लगावला.

हिटमॅन मॅन ऑफ द सीरिज

दरम्यान रोहितने शतकी खेळीसह डबल धमाका केला. रोहितला शतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच रोहित या 3 सामन्यांच्या मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला. रोहितने 202 धावा केल्या. रोहितला यासाठी मालिकावीर पुरस्कारने सन्मानित केलं गेलं.

रोहितकडून ऑस्ट्रेलियातील चाहत्यांचे आभार

संगकाराचा रेकॉर्ड ब्रेक

दरम्यान विराटने 74 धावांच्या खेळीसह मोठा कारनामा केला. विराटने श्रीलंकेच्या कुमार संगकारा याला मागे टाकलं. विराट यासह वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तर संगकाराची तिसर्‍या स्थानी घसरण झाली. तर सर्वाधिक एकदिवसीय धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.