AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : 75 डाव खेळूनही शतक होईना, विराट कोहलीचं दुःख संपेना, कसोटी सामन्यातही ‘जैसे थे’

रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने चौकार मारून खाते उघडले. पण बेन स्टोक्सचा एक उसळता चेंडू त्याला समजू शकला नाही. बॅटची बाहेरची कड घेत चेंडू यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सकडे गेला. बॉल त्याच्या हातात आला नाही. पण पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या रूटने एका हाताने कोहलीचा अप्रतिम झेल टिपला.

Virat Kohli : 75 डाव खेळूनही शतक होईना, विराट कोहलीचं दुःख संपेना, कसोटी सामन्यातही 'जैसे थे'
विराट कोहलीImage Credit source: social
| Updated on: Jul 04, 2022 | 8:27 AM
Share

मुंबई : ज्या क्रिकेटरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) एका वर्षात 8-8, 10-10 शतके झळकावण्याची आवड होती. तो खेळाडू आता आपल्या शतकांची संख्या 70 वरून 71 वर नेण्याची तळमळ करत आहे. होय, आम्ही बोलतोय विराट कोहली याच्याविषयी (Virat Kohli), जो गेल्या अडीच वर्षांपासून शतकाचा (Virat Kohli Century) दुष्काळ संपवू शकला नाही. इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात विराट कोहलीची बॅट चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ज्या प्रकारे विराट खेळतो आहे, हे त्याच्या चाहत्यांनाही आवडलेलं दिसत नाही. त्याची शतकाची प्रतीक्षाही कायम आहे.  उजव्या हाताचा फलंदाज विराट कोहली एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 11 धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या डावात त्याला 20 धावा करता आल्या. दोन्ही डावात त्याच्या बॅटमधून काही चांगले शॉट्स आले आणि विराट कोहली वेग पकडेल, असं वाटत होतं. पण, पहिल्या डावात तो आतल्या बाजूनं बोल्ड झाला. तर दुसऱ्या डावात तो स्लिप्सवर झेलबाद झाला. अशा प्रकारे शतकातील दुष्काळ अजूनही कायम आहे.

कधी केलं शतक?

  1. विराट कोहलीचे शेवटचे शतक 2019 च्या उत्तरार्धात आले होते
  2. तेव्हापासून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 75 डाव खेळले आहेत
  3. 2509 धावा केल्या आहेत
  4. 36.89 च्या सरासरीने ज्यामध्ये 24 अर्धशतकांचा समावेश आहे
  5. तीन गुणांची जादुई धावसंख्या अशी आहे
  6. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 94 धावा केल्या
  7. गेल्या 32 महिन्यांत त्याला कोणतीही मोठी धावसंख्या गाठता आलेली नाही.

रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने चौकार मारून खाते उघडले. पण बेन स्टोक्सचा एक उसळता चेंडू त्याला समजू शकला नाही. बॅटची बाहेरची कड घेत चेंडू यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सकडे गेला. बॉल त्याच्या हातात आला नाही. पण पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या रूटने एका हाताने कोहलीचा अप्रतिम झेल टिपला. स्टोक्सने कोहलीला सहाव्यांदा बाद केले. त्याने 40 चेंडूत 20 धावा केल्या.

पाहा व्हिडीओ

9 डावात फक्त 2 अर्धशतके

भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेत विराट कोहली शेवटच्या वेळी फलंदाजीसाठी आला होता. 3 वर्षांपासून त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. त्याला मालिकेतील 9 डावात 28 च्या सरासरीने केवळ 249 धावा करता आल्या. यादरम्यान त्याने 2 अर्धशतके झळकावली. 55 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली.

यादरम्यान त्याला एकही षटकार मारता आला नाही. दुसरीकडे, ऋषभ पंत, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी मालिकेत 300 हून अधिक धावा केल्या आहेत. रोहित आणि राहुल 5वी कसोटीही खेळत नाहीत.

धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल.