IND vs AFG | Virat Kohli ने क्लास दाखवला, फक्त 16 चेंडूत 3 दिग्गजांना दिलं उत्तर, VIDEO
IND vs AFG | या सीरीजआधी विराट कोहलीच्या सिलेक्शनवरुन चर्चा सुरु होती. त्याचा धीमा स्ट्राइक रेट, स्पिनर्स विरुद्ध त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होतं. T20 मध्ये त्याच्या पुनरागमनाला विरोध सुरु होता. पण कोहलीने आपल्या छोट्या इनिंगमध्येच अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

IND vs AFG | बरोबर, एक आठवड्यापूर्वी 7 जानेवारीला BCCI ने अफगाणिस्तान विरुद्ध T20 सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली होती. या सीरीजसाठी बऱ्याच कालावधीनंतर दोन खेळाडूंनी टीम इंडियात पुनरागमन केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली. यात कोहलीच्या पुनरागमनाबद्दल काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. कारण वयाचा विचार करुन त्याला T20 साठी फिट फलंदाज मानल जात नाही. त्याच्या स्ट्राइक रेटबद्दलही बरीच चर्चा सुरु होती. पण इंदूरमध्ये मैदानावर येताच विराटने फक्त 16 चेंडूत सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली.
T20 वर्ल्ड कप 2024 आधी टीम इंडियाची ही शेवटची सीरीज असल्याने यावर सगळ्यांची नजर होती. खासकरुन रोहित शर्मा आणि विराट कोहली कसं प्रदर्शन करतात?. दोन्ही खेळाडू नोव्हेंबर 2022 नंतर T20 टीमममध्ये परतले आहेत. रोहितने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं नाही. दोन्ही सामन्यात तो खात उघडू शकला नाही. पण कोहलीने आपल्या पहिल्याच सामन्यात इरादे स्पष्ट केले.
दुसरा चौकार स्लॉग स्वीपने
मोहालीमध्ये पहिल्या T20 सामन्यात विराट कोहली टीमचा भाग नव्हता. पण इंदूरमध्ये त्याने कमबॅक केलं. टीम इंडिया धावांचा पाठलाग करत होती. रोहित शर्मा आऊट झाला. त्यानंतर कोहलीची एंट्री झाली. कोहलीने दुसराच चेंडू कव्हर्सच्यावरुन चौकार मारला. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मिडविकेटला चौकार मारला. खासबाब म्हणजे दोन्ही बाऊंड्री स्पिनर मुजीब उर रहमानला मारल्या. दुसरा चौकार स्लॉग स्वीपने वसूल केला.
विराटने कोणाला उत्तर दिलं?
स्पिनर्स विरुद्ध विराटची धीमी फलंदाजी ही त्याची समस्या आहे. कोहलीने त्याच्या खेळातून या कमतरतेवर मात करण्यासाठी तयार असल्याच सांगितलं. त्याशिवाय टीमच्या गरजेच्या हिशोबाने आक्रमक फलंदाजीसाठी सुद्धा तयार असल्याच दाखवून दिलं. कोहलीने फक्त 29 धावा केल्या. पण यात 5 चौकार होते. तो 16 चेंडू मैदानात होता. विराटने अशा प्रकारे कॅप्टन रोहित शर्मा, कोच राहुल द्रविड आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर या तिघांना उत्तर दिलं. वर्ल्ड कपसाठी तयार असल्याचे त्याने संकेत दिले.
#KingKohli in his element 👑
The master of chases played a stunning cameo in the 2nd #INDvAFG T20I – LIVE on #JioCinema, #Sports18 & ColorsCineplex.#IDFCFirstBankT20ITrophy #JioCinemaSports #GiantsMeetGameChangers pic.twitter.com/yfUadm6DwR
— JioCinema (@JioCinema) January 14, 2024
विराटने फक्त टीकाकारांना उत्तरच दिलं नाही, तर त्याने अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन उल हकला आपला अंदाज दाखवला. मागच्यावर्षी आयपीएलमध्ये कोहली आणि नवीन उल हकमध्ये भांडण झालं होतं. कालच्या सामन्यात विराटने नवीनला आपला क्लास दाखवून देणारा सिक्स मारला.
