AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट अ कॅच! हा झेल पाहिला तर असंच म्हणाल, पाहा कसा पकडला Watch Video

वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स यांच्यात टी सामना रंगला. वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. वेलिंग्टनने 20 षटकात 8 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हानं सेंट्रल स्टॅगने 4 गडी गमवून पूर्ण केलं. पण या सामन्यातील झेल सोशल मीडियावर चर्चेत राहिला.

व्हॉट अ कॅच! हा झेल पाहिला तर असंच म्हणाल, पाहा कसा पकडला Watch Video
क्या बात है! उलट धावत जाऊन असा झेल म्हणजे अप्रतिमच, पाहा व्हिडीओ कसं पाठवलं खेळाडूला तंबूत
| Updated on: Jan 13, 2024 | 5:52 PM
Share

मुंबई : जगभरात टी20 क्रिकेटचं वेड पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी टी20 स्पर्धांचं आयोजन केलं जात आहे. न्यूझीलंडमध्येही बर्गर किंग सुपर स्मॅश टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत वेलिंग्टन फायरबर्ड्स आणि सेंट्रल स्टॅग्स हे दोन संघ आमनेसामने आले होते. यावळी वेलिंगस्टन फायरबर्ड्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी केली. वेलिंगटोन फायरबर्ड्स संघाने 8 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं. सेंट्रल स्टॅगने 4 गडी गमवून 148 धावा केल्या. हा सामना 6 गडी राखून सेंट्रल स्टॅगने जिंकला. विजयी धावांचा पाठलाग करताना यंग आणि बोयले ही जोडी मैदानात उतरली होती. दोघांनी 5 षटकात 36 धावा केल्या होत्या. त्यामुळे ही जोडी फोडण्याचं मोठ आव्हान होतं. त्यामुळे सहावं षटक स्नेडनकडे सोपण्यात आलं. स्नेडनच्या दुसऱ्या चेंडूवर यंगने उत्तुंग फटका मारला. पण जॉनसनने पाठमागे जोरदार धावा घेतली आणि सीमारेषेवर उलटा कॅच पकडला. तसेच षटकार जाऊ नये म्हणून चेंडू मागे फेकला. केलीने लगेच तो झेल घेतला आणि यंगला तंबूचा रस्ता दाखवला. हा क्रिकेटमधील सर्वात कठीण आणि जबरदस्त झेल असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

विल यंगची विकेट पडल्यानंतर जॅक बोयलने बाजू सावरली. त्याने 43 चेंडूत 57 धावा केल्या. यात 10 चौकारांचा समावेश होता. वेलिंग्टोन फायरबर्ड्सने दिलेलं आव्हान संघाने 4 गडी गमवून आणि 19 चेंडू राखून पूर्ण केलं. असं असलं तरी वेलिंगटोनचा संघ 22 गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर सेंट्रल स्टॅग संघ गुणतालिकेत 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

वेलिंग्टन फायरबर्ड्सचा संघ : नाथन स्मिथ, निक ग्रीनवूड, निक केली (कर्णधार), मुहम्मद अब्बास, जेस्से तश्कॉफ, ट्रॉय जॉनसन, कलम मॅकलाचलन, लोगान वॅन बीक, पीटर यंगहजबंड, लाईन मॅकपीक, मायकेल स्नेडन

सेंट्रल स्टॅग्सचा संघ : विल यंग, जॅक बोयले, डेन क्लिव्हर (विकेटकीपर), टॉम ब्रुसे, विल्यम क्लार्क, डॉउग ब्रेसवेल, बेवन स्मॉल, जोय फिल्ड, अजाझ पटेल, ब्लेयर टिकनर, जेडन लेनोक्स

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.