Hardik Pandya : हार्दिकची मोठी चूक, टीममधल्या ‘या’ प्लेयरवर त्याचा काही राग आहे का?

मुंबई इंडियन्सचा IPL 2024 च्या सीजनमध्ये सलग दुसरा पराभव झाला. या पराभवाला हार्दिक पांड्याची रणनिती सुद्धा काही प्रमाणात जबाबदार आहे. मागच्या दोन सीजनप्रमाणे या सीजनची सुरुवात सुद्धा मुंबई इंडियन्ससाठी चांगली झालेली नाही. हार्दिक पांड्याने मैदानात अशी काय चूक केली? ते जाणून घ्या.

Hardik Pandya : हार्दिकची मोठी चूक, टीममधल्या 'या' प्लेयरवर त्याचा काही राग आहे का?
Hardik Pandya Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:14 AM

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोर जाव लागलं. बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सवर 31 धावांनी विजय मिळवला. मुंबईने या सामन्यात विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली लढत दिली. पण पराभव पदरी पडला. सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. डेब्यु मॅच खेळणारा क्वेना मफाका तसेच अनुभवी गोलंदाज पीयूष चावला यांची जोरदार धुलाई झाली. गेराल्ड कोएत्जी सुद्धा महागडा ठरला. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा यांच्यानंतर हेनरिक क्लासेन आणि एडेन मार्करामने तुफान फलंदाजी केली. परिणामी सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्या उभारली.

या दरम्यान मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्याची रणनिती समजली नाही. एकाबाजूला गोलंदाजांची धुलाई सुरु होती. दुसऱ्याबाजूला मुंबई इंडियन्सचा स्ट्राइक बॉलर जसप्रीत बुमराह गोलंदाजीपासून लांब होता. बुमराहने चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्यांदा चेंडू हातात घेतला. त्यानंतर 9 ओव्हर त्याला गोलंदाजीच दिली नाही. थेट 13 व्या ओव्हरमध्ये त्याने त्याच दुसर व्यक्तीगत षटक टाकलं. तो पर्यंत हैदराबादच्या 12 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 173 धावा झाल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहच चांगला गोलंदाज ठरला. भले त्याला एकही विकेट मिळाला नाही. पण त्याने 4 ओव्हरमध्ये 9 च्या सरासरीने 36 धावा दिल्या. इतर गोलंदाजांनी बुमराहपेक्षा जास्त धावा लुटवल्या.

मुंबईकडून पदार्पण करणारा मफाका हा सामना लक्षात नाही ठेवणार

जसप्रीत बुमराह सोडल्यास कुठल्याही गोलंदाजाने 10 पेक्षा कमी इकॉनमीने धावा दिल्या नाहीत. तो मुंबईसाठी किफायतशीर गोलंदाज ठरला. बुमराहच्या गोलंदाजीवर फक्त 1 सिक्स आणि 2 चौकार वसूल केले. पदार्पण करणारा मफाका हा सामना कधी लक्षात ठेवणार नाही. त्याने 4 ओव्हरमध्ये 66 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने 4 ओव्हरमध्ये 46 धावा दिल्या. गेराल्ड कोएत्जीने 57 धावा देऊन 1 विकेट काढला.

Non Stop LIVE Update
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.