AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मजबूत संघ कोणता? सर्व आठ संघांची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन एका क्लिकवऱ

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. या स्पर्धेसाठी अंतिम 15 खेळाडूंच्या संघावर मोहोर लागली आहे. गेल्या काही दिवसात खेळाडूंच्या दुखापतींमुळे संघात बरेच बदल झाले. मात्र आता 15 खेळाडूंच्या संघावर शिक्कामोर्तब झालं आहे. चला जाणून घेऊयात 8 संघातील बेस्ट प्लेइंग 11

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मजबूत संघ कोणता? सर्व आठ संघांची सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन एका क्लिकवऱ
| Updated on: Feb 18, 2025 | 4:08 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आठ वर्षानंतर आयोजन केलं गेलं आहे. 2017 मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळली गेली होती. यंदा या स्पर्धेची नववी आवृत्ती आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला 1998 मध्ये सुरुवात झाली आणि आतापर्यंत 8 पर्व पार पडली आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी दोन गटात विभागणी केली असून अ आणि ब गट पाडले आहेत. अ गटात भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. या स्पर्धेसाठी आठही संघांनी आपले 15 खेळाडू जाहीर केले आहेत. महिनाभरापूर्वी संघ जाहीर केले होते. पण काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघात बदल करण्यात आले. या स्पर्धेतील पहिला सामना 19 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. दरम्यान, आठही संघाची बेस्ट प्लेइंग 11 कशी असेल याचा एक अंदाज पाहूयात..

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि रवींद्र जडेजा.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बाबर आझम, फखर जमान, सौद शकील, तय्यब ताहिर, सलमान अली आघा, खुशदिल शाह, अबरार अहमद, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह.

ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, शॉन अ‍ॅबॉट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अ‍ॅरॉन हार्डी, ट्रॅव्हिस हेड, जोश इंगलिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, अ‍ॅडम झांपा आणि स्पेन्सर जॉन्सन.

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), फिल साल्ट, जोफ्रा आर्चर, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन/जेमी स्मिथ, आदिल रशीद, जो रूट आणि मार्क वूड.

अफगाणिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :रहमानउल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झदरान, रहमत शाह, एच शाहिदी (कर्णधार), अझमतुल्लाह उमरझाई, गुलबदिन नायब मोहम्मद नबी, रशीद खान, एन अहमद/एन खरोटे, नवीद झदरान आणि फजलहक फारुकी

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, मार्को जानसेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा आणि तबरेज शम्सी.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, विल ओ’रोर्क, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिचेल.

बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन : नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), सौम्या सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदयॉय, मुस्तफिजूर रहमान, नाहिद राणा, तस्किन अहमद, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन आणि महमुदुल्लाह.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.