AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या

IPL 2025 Playoff Scenario: आयपीएलमध्ये प्लेऑफ स्थान निश्चित करण्यासाठी किमान 16 गुण पुरेसे आहेत. पण दहाही संघांमध्ये चांगली स्पर्धा असेल तर ते 14 किंवा 12 गुण मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. चला जाणून घेऊयात कोणत्या संघाला किती सामने जिंकायचे ते

आयपीएल 2025 स्पर्धेत प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र? कोणाचा होणार पत्ता कट? जाणून घ्या
| Updated on: Apr 29, 2025 | 4:39 PM
Share

इंडियन प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत 47 सामने पूर्ण झाले आहेत. या सामन्यांच्या शेवटी एका संघाचे 14, तीन संघांचे प्रत्येकी 12 गुण होते आहेत. तर इतर संघही उर्वरित सामन्यांचं गणित पाहता शर्यतीत आहेत. या आठवड्यात प्लेऑफचं चित्र काही अंशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संघांची धाकधूक वाढली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होणार आहे. जर आपण पाहिले की प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला किती सामने जिंकावे लागतील…

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघाने 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तसेच गुणतालकिते टॉपला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अजून 4 सामने खेळायचे आहेत आणि यापैकी एक सामना जिंकला तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

मुंबई इंडियन्स: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. जर त्यांनी उर्वरित 4 पैकी 2 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात.

गुजरात टायटन्स: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स 9 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवून पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. 16 गुण मिळवण्यासाठी आणि पुढील टप्प्यात जाण्यासाठी गुजरात टायटन्सला उर्वरित 5 पैकी दोन सामने जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्स: अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने 9 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 6 सामने जिंकले आहेत. जर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या पुढील 5 पैकी दोन सामने जिंकले, तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित करतील.

पंजाब किंग्ज: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि एक गुण मिळाला आहे. त्यामुळे 11 गुण झाले आहेत. जर त्यांनी उर्वरित 5 पैकी तीन सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश करतील.

लखनौ सुपरजायंट्स: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्स संघाने खेळलेल्या 10 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. जर त्यांनी उर्वरित 4 पैकी 3 सामने जिंकले तर ते 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचतील.

कोलकाता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआरने आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे ड्रॉ झाला आहे. त्यामुळे एक गुण मिळाला आहे. जर त्यांनी उर्वरित 5 पैकी 5 सामने जिंकले तर त्यांना 17 गुण मिळू शकतात. अशा प्रकारे टॉप 4 मध्ये येऊ शकता.

राजस्थान रॉयल्स: संघाने 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. आरआरला अजून 4 सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी ते सर्व जिंकले तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. पण ते फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाचे 14 गुण असतील. त्यातही नेट रनरेट चांगला असायला हवा.

सनरायझर्स हैदराबाद: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यांपैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. जर सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित सर्व पाच सामने जिंकले तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

चेन्नई सुपर किंग्ज: महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाने खेळलेल्या 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. अजून पाच सामने खेळायचे आहेत आणि जर त्यांनी हे सामने जिंकले तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतात. पण पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचे 14 गुण असल्यास ते नेट रन रेटच्या आधारे प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात.

Follow Us
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं..
MPSC Protest : MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् पोलिसांचा मोठा इशारा; आंदोलनस्थळ रिकामं करण्याच्या दिल्या सूचना, मात्र रुपाली पाटील म्हणाल्या...
सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक...
Mallikarjun kharge : सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून राजघाटावर जाणार; खरगे आक्रमक, मत चोरीवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप
नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी....
Mamata Kulkarni on Nana Patekar : नानांसोबत दोन फिल्म केल्या, तिसरी करायची होती पण…; ममता कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांच्या आठवणींना दिला उजाळा
दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
Delhi India Alliance Morcha : दिल्लीत इंडिया आघाडीचं आंदोलन; राहुल गांधी आंदोलनस्थळी दाखल
नाना पाटेकरांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय...
नाना पाटेकरांचे हृदयविकाराच्या झटक्यानं मात्र निधन मध्यरात्री काय घडलं होतं? डॉक्टरांनी सर्व सांगितलं
विचार जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नानांच्या आठवणीने गडकरी भावुक...
Nitin Gadkari On Nana Patekar : विचार जसे जुळतात, तसं जॅकेटही फिट्ट झालं; नाना पाटेकरांच्या आठवणीने नितीन गडकरी भावुक, म्हणाले...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम...
नाना पाटेकर यांच्या ‘नानाची वाडी’त होणार अंत्यसंस्कार; अंतिम यात्रेची तयारी सुरू
शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
Nana Patekar Passes Away: शरद पवार जीएमसी रुग्णालयात पोहोचले; काय म्हणाले?
10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र
Delhi India Alliance : इंडिया आघाडीचा मोठा प्लॅन; 10 खासदारांचं शिष्टमंडळ उद्या राष्ट्रपतींच्या भेटीला - सूत्र