AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीला का पाठवलं? अभिषेक शर्माने या मागचं कारण सांगितलं

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी20 सामना बेलेरिव्ह ओव्हल मैदानात होणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारताला ही मालिका जिंकायची तर उर्वरित तिन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तत्पूर्वी अभिषेक शर्माने हार्षित राणाबाबत एक खुलासा केला आहे.

हार्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीला का पाठवलं? अभिषेक शर्माने या मागचं कारण सांगितलं
हार्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीला का पाठवलं? अभिषेक शर्माने या मागचं कारण सांगितलंImage Credit source: PTI
| Updated on: Nov 01, 2025 | 3:41 PM
Share

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. अभिषेक शर्मा आणि हार्षित राणा वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही.या सामन्यात अभिषेक शर्माने 37 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारत 68 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट होता. तर हार्षित राणाने 33 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार मारत 35 धावांची खेळी केली. या दोघांशिवाय इतर फलंदाजींनी दुहेरी आकडाही गाठला नाही. इतकंच काय तर तीन फलंदाजांना तर खातंही खोलता आलं नाही. पण या सामन्यात अष्टपैलू शिवम दुबेच्या आधी हार्षित राणाला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे गौतम गंभीरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. भारताने सामना गमावल्यानंतर अभिषेक शर्माने या प्रश्नाचं उत्तर दिलं. या निर्णयामागचं खरं कारण काय ते सांगितलं.

अभिषेक शर्मा पत्रकार परिषदेला सामोरं गेल्यानंतर त्याला हार्षित राणाच्या बॅटिंग प्रमोशनबाबत प्रश्न विचारला गेला. तेव्हा अभिषेक शर्मा म्हणाला की, ‘पहिलं तर हार्षित राणा फलंदाजी करतो. ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. कारण नेट्समध्ये तो माझ्या चेंडूवर षटकार मारतो. यासाठी प्लान ठरलेला होता की आम्हाला लेफ्ट हँड आणि राइट हँड कॉम्बिनेशन ठेवायचं आहे. यासाठी हार्षित राणाला शिवम दुबेच्या आधी फलंदाजीला पाठवण्यात आलं आहे. त्याला मी इतकंच बोललो की नॉर्मल खेळायचं आहे. त्यामुळे आम्ही चांगली भागीदारी करू शकू.’

भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 125 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमवून 13.2 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारतीय गोलंदाजांनी त्यातल्या काही संघर्ष देण्याचा प्रयत्न केला. ऑस्ट्रेलियाला या धावांचा पाठलाग करण्यापासून रोखताना 6 विकेट घेतल्या. जर ही धावसंख्या 180 च्या पार असती तर कदाचित चित्र वेगळं असतं. आता भारताला ही मालिका जिंकण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकणं भाग आहे. तिसरा सामना गमावला तर मालिका वाचवण्यासाठी धडपड करावी लागेल.

Follow Us
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात