AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022, LSG vs MI, Match Prediction : आज मुंबई इंडियन्स विजयाचं खातं उघडणार?, की लखनौ पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच करणार?

मुंबई इंडियन्ससाठी पुढचा प्रवास सोपा नाही. या हंगामात संघाने आपल्या कामगिरीने चाहत्यांची सतत निराशा केली आहे. आजचा दिवस त्यांच्यासाठी महत्वाचा आहे,.

IPL 2022, LSG vs MI, Match Prediction : आज मुंबई इंडियन्स विजयाचं खातं उघडणार?, की लखनौ पॉईंट्स टेबलमध्ये आगेकुच करणार?
Mumbai Indians Image Credit source: Mumbai Indians
| Updated on: Apr 24, 2022 | 7:05 AM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. लखनौने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण सात सामने खेळवले आहे. त्यापैकी लखनौच्या संघाला चार सामन्यात यश आलंय. तर तीन सामन्यात लखनौच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचा नेट रेट 0.124 आहे. तर या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये आठ गुण मिळाले आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा विचार केल्यास या संघाला अजूनही विजयाचं खातं आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये उघडता आलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले आहे. त्या सातही सामन्यात त्यांना अपयश आलंय. इंडियन्सचा रन रेट -0.892 असून हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात खाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

प्लेऑफमध्ये इंडियन्स जाणार?

लीगमधील 14 सामन्यांपैकी पहिले 7 सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत. अशा स्थितीत मुंबईने आगामी सात सामने जिंकले तरी केवळ 14 गुण जमा करू शकतील. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाचे 16 गुण असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईचा संघ उर्वरित संघांच्या बाजूने असेल आणि संघाने धावगती सुधारली तर एक टक्का मुंबई पात्र ठरेल, असं बोललं जातंय.

पुढचा प्रवास सोपा नाही

मुंबई इंडियन्ससाठी पुढचा प्रवास सोपा नाही. या हंगामात संघाने आपल्या कामगिरीने चाहत्यांची सतत निराशा केली आहे. सरतेशेवटी, हेंद्रसिंग धोनी आणि (ड्वेन) प्रिटोरियसने सामना हिरावून घेतला, असे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एका रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध तीन विकेट्सने पराभव केल्यानंतर सांगितलंय. तो त्यावेळी म्हणालाल की, ‘सुरुवातीच्या विकेट्स गमावूनही आम्ही चांगली धावसंख्या उभारू शकलो. आम्ही चांगले आव्हान पेलले आणि गोलंदाजांनी आम्हाला सामन्यात रोखले. पण आरामात असलेला एमएस धोनी काय करू शकतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे. शेवटी धोनी आणि (ड्वेन) प्रिटोरियसने सामना आमच्यापासून हिरावून घेतला. आम्ही शेवटी त्याच्यावर दबाव कायम ठेवला. त्या्मुळे आजचा सामना जिंकणे मुंबई इंडियन्ससाठी गरजेचं आहे.

पॉईंट्स टेबलचं गणित

लखनौने आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एकूण सात सामने खेळवले आहे. त्यापैकी लखनौच्या संघाला चार सामन्यात यश आलंय. तर तीन सामन्यात लखनौच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला पॉईंट्स टेबलमध्ये आठ गुण मिळाले आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा विचार केल्यास या संघाला अजूनही विजयाचं खातं आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये उघडता आलेलं नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले आहे. त्या सातही सामन्यात त्यांना अपयश आलंय.

इतर बातम्या

Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’

Amravati Shiv Sainik | रवी राणांचा घरावर दगडफेक केल्याचा आरोप; अमरावतीत शिवसैनिक आक्रमक

Jammu Encounter Video : हाडं गोठवणाऱ्या जम्मूतल्या एन्काऊंटरचं सीसीटीव्ही फुटेत आलं समोर, दहशतवाद्यांकडून अंधाधूंद गोळीबार

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.