UPW vs MUM Toss : मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल, यूपीविरुद्ध फिल्डिंग, पाहा Playing 11
UP Warriorz Women vs Mumbai Indians Toss : मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईचे गोलंदाज यूपीला किती धावांवर रोखतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील 16 व्या सामन्यात यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. हा सामना लखनऊमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने यूपीविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेत यूपीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
प्लेइंग ईलेव्हनबाबत थोडक्यात
यूपी वॉरियर्सने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यूपीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर मुंबई इंडियन्सने एकमेव बदल केला आहे. जिंतीमनी कलिता हीच्या जागी पारुनिका सिसोदीया हीचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड्स
मुंबई विरुद्ध यूपी यांच्यात आतापर्यंत डब्ल्यूपीएलच्या इतिहासात एकूण 6 सामने झाले आहेत. मुंबईचा या 6 पैकी सर्वाधिक सामन्यांमध्ये दबदबा राहिला आहे. मुंबईने यूपीविरुद्ध 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर यूपीने 2 वेळा विजय मिळवला आहे. तसेच या हंगामात दोन्ही संघ 26 फेब्रुवारीला आमनेसामने आले होते. तेव्हा मुंबईने यूपीचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता यूपी या पराभवाचा वचपा काढणार की मुंबई या हंगामात यूपीविरुद्ध सलग दुसरा विजय मिळवणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबईने टॉस जिंकला, पलटणची फिल्डिंग, यूपीची बॅटिंग
🚨 Toss 🚨@mipaltan won the toss and elected to field against @UPWarriorz
Updates ▶️ https://t.co/JkJlE423GC #TATAWPL | #UPWvMI | @UPWarriorz | @mipaltan pic.twitter.com/kOud3jxilI
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 6, 2025
मुंबई इंडियन्स महिला प्लेइंग इलेव्हन : यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, जी कमलिनी, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदीया.
यूपी वॉरियर्स महिला प्लेइंग इलेव्हन : दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, जॉर्जिया वॉल, वृंदा दिनेश, श्वेता सेहरावत, उमा चेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, गौहर सुलताना आणि क्रांती गौड.
