AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs BAN : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना ड्रा, श्रीलंका बांगलादेशला मिळाले असे गुण

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना ड्रॉ झाला आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका हा सामना निकालाविना संपला आहे. यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काय परिणाम झाला ते जाणून घ्या. कोणला किती गुण मिळाले ते समजून घ्या.

SL vs BAN : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना ड्रा, श्रीलंका बांगलादेशला मिळाले असे गुण
SL vs BAN : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना ड्रा, श्रीलंका बांगलादेशला मिळाले असे गुणImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Jun 21, 2025 | 6:06 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात पार पडला. पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतरही या सामन्याचा काही निकाल लागला नाही. त्यामुळे सरते शेवटी हा सामना ड्रॉ झाला. नाणेफेकीचा कौल जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने पहिल्या डावात 495 धावांची खेळी केली. दोन दिवस बांगलादेशने फलंदाजी केली. तसेच तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी श्रीलंकेने आक्रमक फलंदाजी करत 485 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या डावात बांगलादेशकडे 10 धावांची आघाडी होती. या आघाडीसह पुढे खेळताना बांगलादेशने 6 गडी गमवून 285 धावा केल्या आणि डाव घोषित केला. श्रीलंकेसमोर विजयासाठी 295 धावांचं आव्हान दिलं. पाचव्या दिवशी शेवटच्या दोन सत्रात हे आव्हान गाठणं काही सोपं नव्हतं. श्रीलंकेने 4 गडी गमवून 74 धावा केल्या आणि हा सामना ड्रॉ झाला. हा सामना ड्रॉ झाल्याने गुणतालिकेत काय फरक पडला ते जाणून घ्या.

श्रीलंका आणि बांग्लादेश सामना ड्रॉ झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण मिळाले आहेत. तसेच दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 33.33 टक्के इतकी आहे. पुढच्या दोन वर्षात या गुणतालिकेत मोठी उलथापालथ होणार हे नक्की आहे. पण बांग्लादेशसारख्या दुबळ्या संघाने श्रीलंकेला पहिल्या कसोटी झुंजवल्याने श्रीलंकेचं अंतिम फेरीचं गणित किचकट होत जाणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना 25 जूनपासून सुरु होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून असेल.  श्रीलंका एकूण 12 कसोटी सामने खेळणार आहे. त्यापैकी एक ड्रॉ झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारीवर परिणाम होणार आहे.

श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डीसिल्वा म्हणाला की, ‘पहिल्या डावात आम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, त्यामुळे आम्ही खूप जास्त धावा दिल्या. त्यांनी त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न केले. शांतो आणि मुशी यांनी खरोखरच चांगली फलंदाजी केली, त्यांनी आम्हाला पुन्हा खेळण्याची संधी दिली नाही. अँजेलो मॅथ्यूजबद्दल सांगायचं तर, मी त्याच्या नेतृत्वाखाली मैदानात आलो आणि त्याने माझ्या नेतृत्वाखाली त्याचा शेवटचा सामना खेळला. माझ्यासाठी हा एक नकोसा दिवस आहे.’

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता