Wtc Final 2023 आधी रोहित शर्मा जोमात, ऑस्ट्रेलियाचं डोकं उठलं, नक्की काय झालं?

world test championship final 2023 | टीम इंडिया टेस्ट वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. मात्र त्याआधी कॅप्टन रोहित शर्मा याने ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढवलंय.

Wtc Final 2023 आधी रोहित शर्मा जोमात, ऑस्ट्रेलियाचं डोकं उठलं, नक्की काय झालं?
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 12:01 AM

लंडन | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हा महाअंतिम सामना लंडनमध्ये खेळवण्याते येणार असला तरी भारतातील प्रत्येक शहरात वातावरणनिर्मिती झाली आहे. कधी एकदाचा हा सामना सुरु होतोय, असं क्रिकेट चाहत्यांना झालंय. या कसोटी वर्ल्ड कपसाठी फायनल सामना बुधवारी 7 जूनपासून ते 11 जूनपर्यंत लंडनमधील द ओव्हल इथे खेळवण्यात येणार आहे. या हायव्होल्टेज सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी या अटीतटीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी पॅट कमिन्स याच्याकडे आहे. तर रोहित शर्मा भारतीय संघांचं नेतृत्व करणार आहे.

या रोहित शर्मा याच्यामुळे कांगारुंचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायलनआधी टेन्शन दुप्पटीनं वाढलं आहे. रोहित शर्मा याचा कार्यक्रम कसा करावा, या विचारात ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम मॅनेजमेंट आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

कॅप्टन म्हणून रोहित शर्मा याच्याकडे कामगिरीकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. रोहितने इथे या ओव्हलमध्ये 2 वर्षांपूर्वी इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं. ज्यामुळे आता ऑस्ट्रेलियाची परिस्थिती जरा बिकट अशी झाली आहे.

रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतच 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं. रोहितने 256 बॉलमध्ये 127 धावांची शतकी खेळी साकारली होती. रोहितच्या या शतकामुळे टीम इंडियाचा विजय झाला होता. त्यामुळे रोहित शर्मा याच्याकडून टीम इंडियाला 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा अशाच शतकी खेळीची अपेक्षा असणार आहे.

रोहितचं शतक

WTC Final साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया

पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.