Yash Dhull: फायनलआधी मुलाला वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, विजय सिंह यशला म्हणाले…

अंतिम फेरीत भारताचा सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला नमवलं होतं.

Yash Dhull: फायनलआधी मुलाला वडिलांनी दिला मोलाचा सल्ला, विजय सिंह यशला म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 2:44 PM

मुंबई: भारताच्या युवा संघाची अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (ICC Under-19 World Cup) दमदार कामगिरी सुरु आहे. भारताच्या या युवा टीमने अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया सारख्या मजबूत संघावर विजय मिळवला. भारताच्या विजयाचा नायक ठरला कॅप्टन यश धुल. (Yash Dhull) त्याच्या शतकी खेळीच्या बळावरच भारताला विजय संपादन करता आला. भारतीय संघ (Indian Team) अंतिम फेरीत पोहोचल्याने यश धुलचे वडिल विजय सिंह खूप आनंदात आहेत. भारतीत संघ नक्की विश्वचषक जिंकून भारतात परतेल, असा यशच्या वडिलांना विश्वास आहे. पण त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखू नका, असा सल्लाही दिला आहे. भारताने सलग चौथ्यांदा अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना शनिवारी इंग्लंडविरुद्ध होणार आहे. इंग्लंडने सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानच्या संघाला नमवलं होतं.

जो संघ त्या दिवशी चांगला खेळ दाखवेल, तो…. “वर्ल्डकपमध्ये सर्व मुलं चांगलं क्रिकेट खेळतायत. फायनलमध्ये दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. त्यामुळे जो संघ त्या दिवशी चांगला खेळ दाखवेल, तो सामना जिंकणार. एक भारतीय या नात्याने आपला संघ जिंकला पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. पण दुसरा संघ सुद्धा अंतिम फेरीत पोहोचला आहे. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा सम्मान केला पाहिजे. वर्ल्डकप जिंकून टीम इंडिया भारतात परतेल, या बद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. पण दुसऱ्या संघाला कमकुवत समजू नका” असं विजय सिंह टीवी9 भारतवर्षशी बोलताना म्हणाले.

फायनलचा दबाव नाही घेणार “यश कुठल्याही स्टेजवर नॉर्मल असतो. मैदानात असताना ज्या गोष्टी तिथे घडत असतात, त्यावर त्याचं लक्ष असतं. तो जास्त दबाव घेत नाही. तो बाहेरच्या गोष्टींचाही विचार करत नाही. संघाच्या गरजेनुसार तो मैदानावर निर्णय घेतो. दबाव घेण्याचा त्याचा स्वभाव नाही. मैदानाबाहेरही तो जास्त क्रिकेटबद्दल बोलत नाही” असं विजय सिंह म्हणाले. यशने आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्याच नाव त्या यादीत आहे. काही दिवसांनी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये यश धुलसाठी सुद्धा बोली लागेल.

संबंधित बातम्या:

Shardul Thakur: ‘हो, मी खराखुरा ऑलराऊंडर’, शार्दुल ठाकूरने हार्दिक पंड्या बाबतही केलं वक्तव्य U19 World Cup: मायकल वॉनला दिसला भारताच्या अंडर 19 टीममध्ये असामान्य खेळाडू, म्हणाला…. Yash Dhull: यश धुलने मैदानाबाहेर लगावलेला ‘हा’ सिक्सर नक्की पाहा, तुम्ही सुद्धा म्हणाल What a hit, पाहा VIDEO

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.