AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशी याच्या वाढल्या अडचणी, भारतात दाखल होताच होणार चाैकशी, ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात..

​Vaibhav Suryavanshi Fitness Test : वैभव सूर्यवंशी क्रिकेटरमध्ये धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे अत्यंत कमी कालावधीमध्ये त्याने एक खास ओळख निर्माण केली. आता सध्या तो ऑस्टेलिया दाैऱ्यावर आहे. मात्र, त्याला भारतात येताच चाैकशीला सामोरे जावे लागेल.

वैभव सूर्यवंशी याच्या वाढल्या अडचणी, भारतात दाखल होताच होणार चाैकशी, ऑस्ट्रेलिया दाैऱ्यात..
Vaibhav Suryavanshi
| Updated on: Oct 08, 2025 | 1:10 PM
Share

स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी हा सध्या ऑस्टेलिया दाैऱ्यावर असून तो युवा कसोटी मालिका खेळतोय. टीम इंडिया या मालिकेतील दुसरा सामना खेळतंय. धमाकेदार गेम खेळताना वैभव दिसला. मालिकेतील पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने शतक करून सर्वांची मने जिंकली. यामधील सर्वात विशेष बाब म्हणजे त्याने जलद धावा करून मोठा इतिहास रचला. राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स संचालक झुबिन भरुचा यांचे मत आहे की, वैभव सूर्यवंशी याचा लवकर वरिष्ठ संघात समावेश करावा. यादरम्यान त्यांनी थेट सचिन तेंडुलकर याचे उदाहरण देखील दिले. वरिष्ठ संघात निवड होण्याच्या अगोदर आता वैभव सूर्यवंशीच्या अडचणीत वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.

10 ऑक्टोंबरला कसोटी सामने संपतील आणि वैभव सूर्यवंशी हा भारतात परतेल. मात्र, भारतात येताच त्याला मोठ्या चाैकशीचा सामना करावा लागेल. टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक आणि राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी नुकताच वैभवला मोठा इशारा दिला. हेच नाही तर त्यांनी स्पष्ट म्हटले की, भारतात परत आल्यावर तुझी चाचणी केली जाईल. विक्रम राठोड यांनी वैभवला फोन केला आणि काही गोष्टी थेट विचारल्या.

विक्रम राठोड यांनी वैभव सूर्यवंशीला फोन करून म्हटले की, तुझा फिटनेस कसा आहे? यावर उत्तर देत वैभवने म्हटले, फिटनेस मस्त आहे. मात्र, वैभवचे बोलणे त्यांना फार काही पटले नाही. त्यांनी थेट इशारा देत त्याला म्हटले की, तू परत ये… आपण बघूयात. विक्रम राठोड यांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय की, तो परत आल्यानंतर त्याची चाैकशी केली जाणार आहे.

वैभव सूर्यवंशी याला आयपीएलमधून खास ओळख मिळाली आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून तो आयपीएल खेळतो. 2025 च्या हंगामात, त्याने राजस्थान रॉयल्ससाठी षटकार मारून आपले खाते उघडले. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने फक्त 34 चेंडूत शतक केले. आता वैभवचा भारतीय संघात समावेश व्हावा, याकरिता राजस्थान रॉयल्स संघाकडून प्रयत्न केली जात आहेत. यासोबतच राजस्थान रॉयल्स संघाचे प्रशिक्षक विक्रम राठोड वैभवच्य फिटनेससाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अन्... मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी
तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही अन्... मुंडेंनी मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी.
करुणा मुंडेंची मोठी घोषणा, 'या' ठिकाणाहून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
करुणा मुंडेंची मोठी घोषणा, 'या' ठिकाणाहून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात.
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....