पंचांचा निर्णय वैभव सूर्यवंशीच्या डोक्यात गेला, मैदानातच दाखवला असा पवित्रा Video
Australia U19 vs India U19, 2nd Youth Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा युथ कसोटी सामना मॅकेत सुरु आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट काही चालली नाही. फक्त 20 धावा करून बाद झाला. पण यावेळी त्याने पंचांवर राग काढला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली आहे. वैभव सूर्यवंशीचा आक्रमक पवित्रा पाहून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनाही घाम फुटला आहे. त्यामुळे त्याची विकेट लवकर काढणं गोलंदाजांच्या पथ्यावर पडतं. यासाठी गोलंदाजांचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असतात. दुसऱ्या कसोटी कसोटीच्या पहिल्या डावात वैभव सूर्यवंशीला ओपनिंग ऐवजी तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला स्वस्तात बाद करण्याचं आव्हान ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर होतं. पण वैभव सूर्यवंशी नशिबाने का होईन ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या जाळ्यात अडकला. वैभव सूर्यवंशी 14 चेंडूत फक्त 20 धावा करून बाद झाला. पण यावेळी वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर चांगलाच संतापला होता. वैभव सूर्यवंशी पंचांनी दिलेल्या निर्णयामुळे नाराज झाला होता. बाद झाल्यानंतर मैदान सोडण्यापूर्वी त्याने पंचांसोबत काही तर तावातावाने बोलत असल्याचं व्हिडीओतून समोर येत आहे.
ओपनर विहान मल्होत्राची विकेट पडल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वैभव सूर्यवंशी फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा संघाच्या धावा 17 होत्या. त्याच षटकात कर्णधार आयुष म्हात्रे 11 धावा करून बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीवरील जबाबदारी वाढली. वैभवने आपल्या स्वभावाला साजेसा आक्रमक पवित्रा घेतला. गोलंदाजांना दणका दाखवत 2 चौकार आणि एक षटकार मारला. पण सातव्या षटकात नको तेच झालं. चार्ल्स लचमंडच्या गोलंदाजीवर विकेटकीपर एलेक्स ली यंगने त्याचा झेल पकडला. पंचांनी अपीलनंतर लगेच बाद घोषित केलं. पण वैभव सूर्यवंशी या निर्णयाने नाराज होता. कारण त्याला बॅटला चेंडू लागलाच नसल्याचं त्याचं म्हणणं होतं. चेंडू बॅटऐवजी थायपॅडला लागून विकेटकीपरकडे गेला होता.
Unlucky Vaibhav suryavnshi, not happy with umpire decision #vaibhavsuryavanshi pic.twitter.com/ahHNEnNSnR
— ANOOP DEV (@AnoopCricket) October 7, 2025
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर खेळपट्टीजवळच उभा होता. इतकंच काय तर तंबूत परताना पंचांसोबत काहीतरी बोलत होता. मग पंचांशी तावातावाने बोलू लागला. नॉन स्ट्राईकला असलेला वेदांत त्रिवेदी देखील पंचांना काहीतरी म्हणाला. पण पंचांनी बाद दिलं होतं. त्यामुळे वैभव सूर्यवंशीकडे तंबूत परतण्याशिवाय पर्याय नव्हता. वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच इतकं वैतागलेलं क्रीडाप्रेमींनी पाहीलं. नाही तर बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी मान खालून तंबूत जातो. पण यावेळी चित्र काही वेगळं होतं. दुसरीकडे, वैभवला ओपनिंगला न पाठवण्यामागचं कारण काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
