Virat Kohli : विराट कोहलीचा मोठा निर्णय, अचानक संन्यास ? कोट्यावधी चाहत्यांना धक्का
Virat Kohli Instagram Account : आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी आणि टी-20 क्रिकेटमध्ये विराट कोहली आता खेळत नसला तरी आजही क्रिकेट चाहत्यांचा मनात त्याचं स्थान कायम आहे. वनडेमधला त्यांचा नुकताच दिसलेला झंझावात लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. मात्र आता विराट कोहलीने एक मोठा निर्णय घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Virat Kohli : जगातील सर्वाधिक प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या विराटचे जगभरात कोट्यावधी चाहते आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील फॉलोअर्सची संख्याही सर्वाधिक आहे. मात्र याच चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. माजी भारतीय कर्णधार असलेल्या विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट काल रात्री अचानक निष्क्रिय (deactivate) झालं. इन्स्टाग्रामवर विराट कोहलीचं नाव सर्च केल्यावर कुठेही त्याची प्रोफाईल, त्याचं अकाऊंट दिसतच नाहीये, त्यामुळे कोहलीच्या चाहत्यांसह सर्वच जण हैराण झालेत. आता हे पाऊल खुद्द विराटनेच उचललं आहे की त्यामागे काही टेक्निकल समस्या, काही बिघाड आहे, हे स्पष्ट झाललं नाहीये. विराटच्या टीमकडून किंवा मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देखील समोर आलेली नाही.
क्रिकेटच्या जगातील या दिग्गज क्रिकेटपटूचे अकाउंट दिसत का नाहीये असाच सवाल सध्या सर्व चाहत्यांच्या मनात आहे. यामुळे विराटचे चाहते चांगलेच हैराण असून सर्वांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
इन्स्टाग्रामवर कोट्यावधी फॉलोअर्स
विराट कोहलीचे इंस्टाग्रामवर 2ब्बल 27 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. मात्र, आपल्या लाडक्या क्रिकेटरंच अकाउंट अचानक गायब झाल्याने चाहत्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हा काय प्रकार आहे हे कोणालाच कळत नाहीय. त्यामुळे विराटचे जगभरातील चाहते हे एक्स (पूर्वीचं ट्विटर) आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवर विविध पोस्ट, स्क्रीनशॉट शेअर करत अटकळी व्यक्त करत आहेत.

विराटच्या भावाचं अकाऊंटही बंद
खरं तर, विराटचं प्रोफाइल गायब होणे हे जाणूनबुजून केलंय, ते तात्पुरतचं आहे की ते काही तांत्रिक बिघाडामुळे झालंय याबद्दल विराट कोहली, त्याच्या टीमकडून किंवा इंस्टाग्रामकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्याचसोबत त्याच्या भावाचे, विकास कोहली याचेही इन्स्टाग्राम अकाऊंट देखील सर्च अकाऊंटमध्ये दिसत नसल्याने आता याचं गूढ आणखी वाढलं आहे. त्याची प्रोफाइलमध्ये सर्चल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजर्सनाही ‘प्रोफाइल उपलब्ध नाही’ असाच संदेश मिळत आहे.
आधीही घेतला होता ब्रेक
मात्र, विराट कोहलीने सोशल मीडियापासून दूर जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वी त्याच्या अकाउंटवरून अनेक जाहिरातीच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत. आपण क्रिकेट आणि कुटुंबावर अधिक लक्ष केंद्रित करू इच्छितो असे त्याने तेव्हा नमूद केलं होतं. पण यावेळी त्याचं संपूर्ण अकाऊंटच गायब किंवा deactivate झाल्याने चाहते हैराण झाले आहेत.
