CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

| Updated on: Apr 11, 2021 | 12:09 AM

CSK vs DC 2021 Live Score Marathi | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स लाईव्ह

CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result |  पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात
Prithvi Shaw

मुंबई : पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं. दिल्लीकडून शिखर धवनने सर्वाधिक 85 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. या दोघांनी दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. या जोडीने दिल्लीसाठी 138 धावांची सलामी भागीदारी केली. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने 2 तर ड्वेन ब्राव्हो 1 विकेट घेतली. (csk vs dc live score ipl 2021 match chennai super kings vs delhi capitals scorecard online Wankhede Stadium Mumbai in marathi) लाईव्ह स्कोअरकार्ड

Key Events

पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. शॉ ने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

चेन्नईचे गोलंदाज अपयशी

आजच्या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या खऱ्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ड्र्वेन ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 11 Apr 2021 12:07 AM (IST)

    दिल्लीची विजयी सुरुवात

    पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं.

  • 10 Apr 2021 10:47 PM (IST)

    15 षटकात दिल्लीच्या 1 बाद 151 धावा, विजयासाठी 38 धावांची आवश्यकता

    15 षटकात दिल्लीच्या धावफलकावर 151 धावा झळकल्या आहेत. विजयासाठी दिल्लीला 30 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे.

  • 10 Apr 2021 10:45 PM (IST)

    दिल्लीला पहिला झटका, पृथ्वी शॉ 72 धावांवर बाद

    दिल्ली कॅपिटल्सला पहिला झटका बसला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ 72 धावांवर बाद झाला आहे. ड्र्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर मोईन अलीकडे झेल देत शॉ बाद झाला. (दिल्ली 138/1)

  • 10 Apr 2021 10:32 PM (IST)

    पृथ्वी शॉचा गगनचुंबी षटकार

    सामन्यातील 15 व्या षटकात पृथ्वी शॉने मोईन अलीच्या गोलंदाजीवर गगनचुंबी षटकार ठोकत दिल्लीची स्थिती अधिक मजबूत केली आहे. (दिल्ली 136/0)

  • 10 Apr 2021 10:21 PM (IST)

    शिखर धवनचं अर्धशतक

    पृथ्वी शॉपाठोपाठ शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केलं आहे. शिखरने 35 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा पूर्ण केल्या. (दिल्ली 107/0)

  • 10 Apr 2021 10:17 PM (IST)

    पृथ्वी शॉचं धडाकेबाज अर्धशतक

    दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने यंदाच्या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात धडाकेबाज अर्धशतक झळकावलं आहे. त्याने 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 27 चेंडूत 52 धावा फटकावल्या.

  • 10 Apr 2021 10:09 PM (IST)

    फिरकीपटूंमुळे दिल्लीच्या धावगतीला ब्रेक

    जलदगती गोलंदाजांची धुलाई झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सोपवला आहे. त्यामुळे दिल्लीची धावगती धीमी झाली आहे. दिल्लीच्या सलामीवीरांना सातव्या आणि आठव्या षटकात प्रत्येकी 5 धावा जमवता आल्या (दिल्ली 8 षटकात 75/0)

  • 10 Apr 2021 09:55 PM (IST)

    पृथ्वी शॉचा हल्लाबोल, शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर सलग तीन चौकार

    सामन्यातील पाचव्या आणि शार्दुल ठाकूरच्या वैयक्तित पहिल्याच षटकात पृथ्वी शॉने हल्लाबोल केला आहे. शार्दुलच्या या षटकात पृथ्वी शॉने सलग तीन चौकार लगावत या षटकात 17 धावा वसूल केल्या.

  • 10 Apr 2021 09:52 PM (IST)

    4.4 षटकात दिल्लीचं अर्धशतक, शॉ-धवनची फटकेबाजी

    5 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर पृथ्वी शॉने शानदार चौकार लगावत धावफलकावर दिल्लीचं अर्धशतक झळकावलं आहे.

  • 10 Apr 2021 09:46 PM (IST)

    दिल्लीची झोकात सुरुवात, शॉ-धवनची फटकेबाजी

    चेन्नईने 189 धावांचे आव्हान दिल्यानंतर मैदानात आलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी झोकात सुरुवात केली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने फटकेबाजी सुरु केली आहे. दिल्लीने 3.4 षटकात 36 धावा फलकावर लावल्या आहेत. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिखवर धवनने सॅम करनला शानदार षटकार ठोकत आक्रमक स्टान्स घेतला आहे.

  • 10 Apr 2021 09:20 PM (IST)

    दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान

    चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 189 धावांचा आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 188 धावा केल्या. चेन्नईकडून मिस्टर आयपीएल सुरेश रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. मोईन अलीने 36 तर तसेच सॅम करनने 34 धावांची खेळी केली. दिल्लीकडून आवेश खान आणि ख्रिस वोक्स या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

  • 10 Apr 2021 09:08 PM (IST)

    19 व्या ओव्हरमध्ये 23 धावा

    चेन्नईने 19 व्या ओलव्हरमध्ये 23 धावा फटकावल्या. सॅम करनने या ओव्हरमध्ये टॉम करनच्या बोलिंगवर फटकेबाजी केली. सॅमने या ओव्हरमध्ये सलग 2  सिक्स लगावले. त्यानंतर 1 चौकार लगावला.

  • 10 Apr 2021 09:06 PM (IST)

    सॅम करनचे सलग 2 सिक्स

    सॅम करनने टॉम करनच्या बोलिंगवर 19  व्या ओव्हरमध्ये सलग 2 षटकार लगावले.

  • 10 Apr 2021 08:58 PM (IST)

    चेन्नईच्या 17 ओव्हरमध्ये 150 धावा पूर्ण

    चेन्नईने 150 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 17 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून चेन्नईने 150 धावा पूर्ण केल्या आहेत. सॅम करन आणि रवींद्र जाडेजा खेळत आहेत.

  • 10 Apr 2021 08:52 PM (IST)

    धोनी भोपळा न फोडता माघारी

    चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची 14 व्या मोसमाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. धोनी दिल्ली विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात शून्यावर आऊट झाला. धोनीला भोपळाही फोडता आला नाही.

  • 10 Apr 2021 08:48 PM (IST)

    रैना रन आऊट

    मैदानात सेट झालेला सुरेश रैना रन आऊट झाला आहे. रैनाने 36 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने शानदार 54 धावा केल्या.

  • 10 Apr 2021 08:44 PM (IST)

    चेन्नईला चौथा धक्का

    चेन्नईने चौथी विकेट गमावली आहे. अंबाती रायुडूच्या रुपात चौथी धक्का लागला आहे. रायुडू फटकेबाजीच्या नादात कॅच आऊट झाला. रायुडूने 23 धावा केल्या.

  • 10 Apr 2021 08:42 PM (IST)

    सुरेश रैनाचे सिक्सर खेचत शानदार अर्धशतक

    सुरेश रैनाने आयपीएलमध्ये वर्षानंतर जोरदार पुनरागमन केलं आहे. रैनाने दिल्ली विरुद्ध सिक्स खेचत 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 10 Apr 2021 08:26 PM (IST)

    रैनाची जोरदार फटकेबाजी

    वर्षभरानंतर चेन्नईत पुनरागमन केल्लया सुरेश रैना शानदार फलंदाजी करत आहे.  सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये अमित मिश्राच्या बोलिंगवर 17 धावा चोपल्या. यामध्ये रैनाने 2 षटकार लगावले.

  • 10 Apr 2021 08:15 PM (IST)

    रैनाचा शानदार सिक्स

    मिस्टर आयपीएलने नवव्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनच्या गोलंदाजीवर शानदार षटकार लगावला. यासह चेन्नईची धावसंख्या 9 ओव्हरनंतत 3 बाद 66 अशी झाली आहे.

  • 10 Apr 2021 08:12 PM (IST)

    चेन्नईला तिसरा झटका, मोईन अली आऊट

    चेन्नईने तिसरी विकेट गमावली आहे. चेन्नईकडून पदार्पण केलेल्या मोईन अलीच्या रुपात चेन्नईने तिसरी विकेट गमावली. अली चांगली खेळी करत होता. तो सेट झाला होता. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो 36 धावांवर कॅच आऊट झाला. शिखर धवनने मोईनचा चांगला कॅच घेतला. मोईनने 36 धावांची खेळी केली.

  • 10 Apr 2021 08:05 PM (IST)

    सुरेश रैना आणि मोईन अलीने चेन्नईचा डाव सावरला

    सुरेश रैना आणि मोईन अलीने चेन्नईचा डाव सावरला आहे. चेन्नईने पहिले 2 विकेट झटपट गमावले. फॅफ डु प्लेसिस भोपळा न फोडता माघारी परतला. तर ऋतुराज गायकवाड 5 धावांवर बाद झाला. विशेष म्हणजे चेन्नईने हे दोन्ही विकेट 7 धावांवर गमावले. त्यामुळे चेन्नईची खराब सुरुवात झाली. मात्र त्यानंतर अनुभवी रैना आणि चेन्नईकडून पदार्पण केलेल्या मोईनने डाव सावरला.

  • 10 Apr 2021 07:47 PM (IST)

    चेन्नईला दुसरा झटका

    चेन्नईला दुसरा झटका बसला आहे.  ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. ख्रिस वोक्सने गायकवाडला शिखर धवनच्या हाती स्लिपमध्ये कॅच आऊट केलं. 
     
     
  • 10 Apr 2021 07:42 PM (IST)

    चेन्नईला पहिला धक्का

    चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. आवेश खाने फॅफ डु प्लेसिसला शून्यावर  एलबीडबल्यू आऊट केलं आहे.

  • 10 Apr 2021 07:34 PM (IST)

    चेन्नई आणि ऋतुराजची चौकाराने सुरुवात

    चेन्नई आणि ऋतुराज गायकवाडने आयपीेलच्या 14 व्या मोसमाची चौकार लगावत शानदार सुरुवात केली आहे. ऋतुराजने ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर फोर लगावला.

  • 10 Apr 2021 07:31 PM (IST)

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस ही सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 10 Apr 2021 07:16 PM (IST)

    युवा दिल्ली कॅपिटल्सची प्लेइंग इलेव्हन

    शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (कर्णधार), अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, ख्रिस वोक्स, रवीचंद्रन अश्विन आणि टॉम करन.

  • 10 Apr 2021 07:15 PM (IST)

    चेन्नईचे अंतिम 11 शिलेदार

    महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, दीपक चाहर, ड्वेन ब्रावो, फॅफ डु प्लेसीस, रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करन आणि मोईन अली.

  • 10 Apr 2021 07:10 PM (IST)

    दिल्लीकडून 2 खेळाडूचं पदार्पण

    दिल्लीने 2 खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्कियाची उणीव भरुन काढण्यासाठी इंग्लंडच्या ख्रिस वोक्स आणि टॉम करन या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

  • 10 Apr 2021 07:06 PM (IST)

    दिल्लीने टॉस जिंकला

    नाणेफेकीचा कौला दिल्लीच्या बाजूने लागला आहे. रिषभ पंतने टॉस जिंकून चेन्नईला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे. त्यामुळे दिल्ली विजयी आव्हानाचे पाठलाग करणार आहे.

  • 10 Apr 2021 06:57 PM (IST)

    टॉसचा बॉस कोण?

    अवघ्या काही मिनिटांमध्ये नाणेफेक होणार आहे. त्यामुळे हा नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

  • 10 Apr 2021 06:51 PM (IST)

    चेन्नई विरुद्ध दिल्ली आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 11,2021 12:07 AM

Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.