ICC World Cup 2019 : भुवनेश्वरला दुखापत, 'हा' वेगवान गोलंदाज भारतीय संघात दाखल

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये टीम इंडियाचं विजयी अभियान सुरु आहे. या दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सोमवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये पोहोचला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप कुठलीही माहिती दिली नसल्याने भारतीय क्रिकेट चाहते सध्या चिंतातूर आहेत.

ICC World Cup 2019 : भुवनेश्वरला दुखापत, 'हा' वेगवान गोलंदाज भारतीय संघात दाखल

लंडन : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये टीम इंडियाचं विजयी अभियान सुरु आहे. या दरम्यान वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हा भारतीय संघात दाखल होण्यासाठी सोमवारी इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये पोहोचला. दुसरीकडे, भुवनेश्वर कुमारच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापनाने अद्याप कुठलीही माहिती दिली नसल्याने भारतीय क्रिकेट चाहते सध्या चिंतातूर आहेत.


सैनी हा केवळ एक नेट गोलंदाज म्हणून टीम जॉईन करत असल्याचं भारतीय संघाने स्पष्ट केलं आहे. सैनीची विश्वचषकासाठीच्या 15 खेळांडूंच्या संघात स्टॅण्ड बाय म्हणून निवड करण्यात आली होती.

“नवदीप सैनी हा मॅनचेस्टरला पोहोचला आहे. नवदीप हा फक्त एक नेट गोलंदाज आहे आणि तो भारतीय संघासोबत सराव करेल”, असं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (बीसीसीआई) अधिकृरित्या जाहीर केलं.

आयएएनएस न्यूज एजेंसीच्या वृत्तानुसार, “ सैनी एक नेट गोलंदाज म्हणून संघात सहभागी होत आहे. तो रिषभ पंत प्रमाणे कुठल्या खेळाडूचा रिप्लेसमेन्ट म्हणून सहभागी होणार नाही”.

भुवनेश्वरला दुखापत

गेल्या 16 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगला. या सामन्यात भारताने आपला वियजी परंपरा कायम ठेवत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. मात्र, या सामन्यात भारताला एक धक्काही बसला. सामन्यादरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने त्याला सामना अर्ध्यावर सोडून बाहेर पडावं लागलं. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाचव्या षटकात गोलंदाजी करताना भुवनेश्वर कुमारच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे भुवेश्वरला आपले षटकही पूर्ण करता आले नाही. त्याच्याजागेवर विजय शंकरला गोलंदाजी करावी लागली.

भुवनेश्वरची दुखापत गंभीर असून त्याला पुढील 2-3 सामन्यांमध्ये भुवनेश्वरला खेळता येणार नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर तो पुढील आठ दिवसांपर्यंत खेळू शकणार नसल्याने संघ व्यवस्थापनाने सांगितलं. भुवी सध्या फिजिओंच्या देखरेखीत आहे. येत्या 30 जूनला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भुवी खेळण्याची अपेक्षा आहे. मात्र, आता सैनी संघात दाखल झाल्याने भुवीचे फॅन्स चिंतेत आहेत.

भारताचे पुढील सामने

भारत वि. वेस्ट इंडिज, 27 जून

भारत वि. इंग्लंड, 30 जून

भारत वि. बांगलादेश, 02 जुलै

भारत वि. श्रीलंका, 06 जुलै

संबंधित बातम्या :

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी विंडीजला धक्का, आंद्रे रसेल विश्वचषकातून बाहेर

हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे”, अफगाणिस्‍तानचा बांग्‍लादेशला इशारा

India vs Afghanistan : आचार संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी विराट कोहलीला दंड, खात्यात डिमेरिट पॉईंटही जोडला

मोहम्मद शमीची हॅटट्रिक आणि भारताचा विजय, शेवटच्या षटकाचा थरार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *