IPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप

आरसीबीचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. यामुळे संतापलेल्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मीम्सद्वारे संताप व्यक्त केला. विराटने तीन सामन्यात एकूण 18 धावा केल्या आहेत. (Funny memes viral after Virat Kohli poor performance)

IPL 2020 | सलग तिसऱ्या सामन्यात विराटचे अपयश, चाहत्यांचा मीम्सद्वारे संताप

दुबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 11 चेंडूत 3 धावा करुन बाद झाला. सलग तिसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. ट्विटरवर मीम्सद्वारे विराट कोहलीला ट्रोल केले जातेय. (Funny memes viral after Virat Kohli poor performance)

विराट कोहलीने आज 11 चेंडूत अवघ्या 3 धावा केल्या. 13 व्या षटकात राहुल चहरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. विराट कोहलीवर मागील दोन सामन्यांतील अपयशाचा दबाव दिसत होता. राहुल चहरच्या गोलंदाजीवर त्याने कव्हर्सवर फटकावलेला चेंडू मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने झेलला. यामुळे विराट बाद झाला.

आयपीएलच्या 10 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पडिक्कल आणि अ‌ॅरोन फिंच यांनी बंगळुरूच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर डिव्हिलिअर्सने संघाची धावसंख्या 201 वर पोहोचवली.

सनरायझर्स हैदराबाद यांच्याविरुद्धच्या सामन्यात विराटने 13 चेंडूत 14 धावा केल्या. या खेळीत त्याला एकही चौकार अथवा षटकार लगावता आला नव्हता. किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली 5 चेंडूत 1 धाव करु शकला होता. आजच्या सामन्यात 11 चेंडूत 3 धावा करुन तो बाद झाला.

विराट कोहलीच्या या निराशाजनक कामगिरीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्याला ट्रोल केले जात आहे. विविध मीम्सच्या माध्यमातून विराटच्या कामगिरीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातायत.

संबंधित बातम्या:

IPL 2020, RCB vs MI, Live Score Update : मुंबईला चौथा खेळाडू बाद, हार्दिक पांड्या 15 धावांवर तंबूत

राहुल तेवतियाचे 5 षटकार, सिक्सर किंगही चक्रावला, युवराज सिंह म्हणतो, ना भाई ना!

(Funny memes viral after Virat Kohli poor performance)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *